रेंदाळ येथील जिल्हा परिषद शाळेच्या इयत्ता 5 वीचा सदिच्छा समारंभ उत्साहात साजरा
.रेंदाळ येथील जिल्हा परिषद शाळेच्या इयत्ता 5 वीचा सदिच्छा समारंभ उत्साहात साजरा.
------------------------------------
रेंदाळ प्रतिनिधी
सचिन कुंभार.
---------------
हातकणंगले तालुक्यातील कन्या विद्या मंदिर रेंदाळ येथील जिल्हा परिषद शाळेचा पाचवीचा सदिच्छा समारंभ पार पडला यामध्ये शिक्षक स्टाफ, पालक व शालेय समिती यांच्या नियोजनाने सदर कार्यक्रम हा विद्यार्थिनींचा उत्साह, आपुलकी, अभिमानाने साजरा करण्यात आला त्याचसोबत सर्व पालकांनी आपल्या मुलींच्या प्रगतीचा आनंद साजरा करण्यासाठी एकदिलाने पुढाकार घेत कार्यक्रमाचे भव्य आणि दिव्य दिमाखदार आयोजन केले.त्यासोबत शिक्षकांनी जिव्हाळा लावत शैक्षणिक वर्ष खूप काळजीने केल्याने इयत्ता 1ली ते 5 वी च्या विद्यार्थिनींनी प्रेमळ, जिव्हाळ्याच्या आणि कौटुंबिक वातावरणात तसेच
विद्यार्थिनींच्या बौद्धिक गुणवत्तेसोबतच विविध उपक्रमांद्वारे त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी घेतलेले परिश्रम पालकांच्या समाधानाच्या हसऱ्या चेहऱ्यातून स्पष्ट दिसून आले. दर्जेदार प्राथमिक शिक्षणामुळे आपल्या मुलींमध्ये व्यवहारज्ञान, परिस्थिती हाताळण्याची क्षमता आणि जीवनकौशल्ये विकसित होत असल्याची भावना पालकांनी व्यक्त केली. विद्यार्थिनींनी आपल्या मनोगतातून शाळेतील मैत्रीपूर्ण, स्नेहपूर्ण आणि आनंददायी वातावरणात मिळालेल्या शिक्षणाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली मॅडमनी आम्हाला केवळ शिक्षणच नाही, तर आयुष्य जगण्याची कला शिकवली,” असे भावनिक शब्द त्यांच्या भाषणातून उमटले. यामुळे मार्गदर्शन करणाऱ्या आदरणीय शिक्षिका सौ रुपाली आनंदा घाटगे व आनंदा घाटगे सर यांचा सन्मान अत्यंत उत्साहात करण्यात आला हा क्षन उपस्थितांसाठी अभिमानाचा ठरला.हा सोहळा केवळ एक कार्यक्रम नव्हता तर शाळा पालक आणि विद्यार्थिनी यांच्यातील घट्ट नात्याचा सुंदर उत्सव ठरलं.शाळा स्तरावरील या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष तसेच आर टी एस टी चे प्रमुख श्री हर्षकुमार पाटील यांनी भूषविले. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष श्री परशराम हवलदार होते. कन्या विद्यामंदिर रेंदाळ शाळेचे मुख्याध्यापक श्री अनिल वीर सर यांच्या उपस्थितीत तसेच शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, शिक्षक स्टाफ, पालक वर्ग व विद्यार्थी यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला.

No comments: