Header Ads

पैजारवाडीत चिले महाराज भंडारा महोत्सवाची उत्साहात सांगता. जिल्ह्यासह महाराष्ट्र, कर्नाटक ,आंध्रप्रदेश राज्यातील भक्तांनी घेतला दर्शनाचा लाभ...

 पैजारवाडीत चिले महाराज भंडारा महोत्सवाची उत्साहात सांगता.

जिल्ह्यासह महाराष्ट्र, कर्नाटक ,आंध्रप्रदेश राज्यातील भक्तांनी घेतला दर्शनाचा लाभ...

-------------------------

पन्हाळा-माधुरी मस्कर 

9623995566.

---------------------------

!! ओम दत्त चिले ओम !! आणि दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबराच्या नामघोषात श्री क्षेत्र पैजारवाडी (ता.पन्हाळा) येथील चिले मंदिरात श्री.सद्गुरु चिले महारांज भंडारा महोत्सव भक्तिमय वातावरणासह मोठ्या उत्साहात पार पडला.

यावेळी कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यासह अनेक राज्यातील हजारो भाविकांनी श्री दर्शनांचा लाभ घेतला.

पं.पु.श्री.सदगुरु चिले महाराज कासवाकृती समाधी मंदिरात चिले महाराज यांची ४१ वी पुण्यतिथी व भंडारा महोत्सवाची सुरूवात शुक्रवार दि.१० एप्रिल रोजी अखंड नामविना, हरिपाठ व ग्रंथ ज्ञानेश्वरी पारायणाने झाली.


भंडारा उत्सव गुरुवार दि.१६  रोजी सकाळी श्री"ना अभिषेक व विधिवत पूजा करण्यात आली. तसेच महाआरती नंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.

सायंकाळी टाळ मृदंग,धनगरी ढोल,लेझीम हलगी अशा पारंपरिक वाद्यासह हजारो भक्ताच्या उपस्थितीत रथासह भव्य ग्रामप्रदक्षिणा  पालखी सोहळा संपन्न झाला.

यावेळी पैजारवाडी ग्रामस्थांनी पालखीचे स्वागत, पूजा करून भक्तासाठी अल्पोपहार व चहा,सरबताची सोय केली होती.

शुक्रवार दि.१७ रोजी सकाळी नामदेव महाराजांचे १७ वे वंशज कीर्तनकार ह.भ.प. एकनाथ नामदास महाराज (पंढरपूर ) यांचे काल्याचे कीर्तन झाले. दुपारी बालगोपाळाच्या हस्ते हंडी फोडून गोपालकाला पार पडला. महाआरती नंतर भक्तांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. सायंकाळी ध्वजारोहना बरोबरच या भंडारा महोत्सवाची सांगता झाली.

या भंडारा महोत्सव सप्ताह कलावधीत दररोज पहाटे काकड आरती ,सकाळी श्री.ना अभिषेक,त्रिकाल आरती रात्री भजन,कीर्तन प्रवचनाचे कार्यक्रम झाले व आयोजित रक्तदान शिबिरात शेकडो भाविकांनी रक्तदान केले.

कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी, पुणे जिल्ह्यासह महाराष्ट्र कर्नाटक ,आंध्रप्रदेश या राज्यातील हजारो भक्तांनी या उत्सवात मोठ्या श्रद्धेने सहभागी होत श्रीच्या दर्शनाचा लाभ घेतला.

यावेळी प्रा.आरोग्य केंद्र बोरपाडळे, यशवंत आयुर्वेदिक हॉस्पिटल यांनी आरोग्य सेवा पुरवली, परिसरातील सर्व सार्वजनिक संस्था,मंडळ,ग्रामस्थ,व भक्तागणांचे या महोत्सवासाठी सहकार्य लाभले.

यावेळी परमपूज्य सद्गुरु चिले महाराज समाधी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष बाबासाहेब चव्हाण, व्यवस्थापक बाबुराव गराडे, विश्वस्त जयसिंग पारखे, बळवंत घोसाळकर, चंद्रप्रकाश पाटील, सचिव विनायक जाधव, पुजारी बापूजी यादव आदी उपस्थित होते.

No comments:

Powered by Blogger.