Header Ads

शाहू हायस्कूलचे राष्ट्रीय शिष्यवृत्ती परिंक्षेत यश

 शाहू हायस्कूलचे  राष्ट्रीय शिष्यवृत्ती परिंक्षेत यश.

धनश्री घरपणकर

----------------

कळे प्रतिनिधी

साईश मोळे

7507516266.

-----------------


                                   तन्वी 

 कळे:- राष्ट्रीय परीक्षा परिषद नवी दिल्ली यांचे मार्फत राष्ट्रीय आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाते, यावर्षी सन 2025 26 साठी 28 डिसेंबर २०२५ रोजी परीक्षा घेण्यात आली होती .या परीक्षेसाठी विद्यालयातील एकूण 30  विद्यार्थ्यानी परीक्षा दिली होती. त्यापैकी 12 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यातील जिल्हा गुणवंत यादीत दोन विद्यार्थ्यांनी स्थान पटकवले, व शिष्यवृत्तीसाठी पात्र झाले. राजश्री शाहू हायस्कूल काटेभोगाव शाळेतील कु. धनश्री विश्वास घरपण कर 142 गुण व तन्वी परशुराम चौगुले 135 गुण मिळवले .

यादीत स्थान पटकावलेल्या विद्यार्थिनींना दरमहा प्रत्येकी 1000 रुपये प्रमाणे वर्षाला बारा हजार रुपये असे चार वर्षाचे 48 हजार मिळणार आहेत. यामुळे गुणवंत विद्यार्थिनींना शिक्षणासाठी खूप मोठी आर्थिक मदत होणार आहे. मुख्याध्यापक बोरगे सर व वर्गशिक्षिका खोत मॅडम यांचे  विद्यार्थिनींना मार्गदर्शन मिळाले.

No comments:

Powered by Blogger.