Header Ads

गुन्ह्याची ‘बी पार्ट’ मिळत नसल्याने संशय; राधानगरी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह.

 गुन्ह्याची ‘बी पार्ट’ मिळत नसल्याने संशय; राधानगरी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह.

राधानगरी पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गंभीर मारहाणीच्या गुन्ह्याची ‘बी पार्ट’ (प्राथमिक माहिती अहवालाची प्रत) वारंवार मागणी करूनही उपलब्ध करून दिली जात नसल्याने संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. पत्रकारांनी तसेच संबंधितांकडून अनेक वेळा संपर्क साधूनही पोलीस कर्मचाऱ्यांकडून टाळाटाळ केली जात असल्याची चर्चा आहे.

गु.र.नं. 130/2026 अंतर्गत बीएनएसच्या विविध कलमान्वये हा गुन्हा दाखल असून, तळाशी (ता. राधानगरी) येथे राजकीय पूर्ववैमनस्यातून लोखंडी रॉड व काठ्यांनी हल्ला, वाहनांची तोडफोड आणि मारहाणीची गंभीर घटना घडल्याचे फिर्यादीत नमूद आहे. या प्रकरणात काही जण जखमी झाले असून मोठे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे.

अशा गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यात पारदर्शकतेसाठी ‘बी पार्ट’ देणे आवश्यक असताना ती देण्यास टाळाटाळ होत असल्याने पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. यामुळे माहिती लपवली जात आहे का, असा सवालही उपस्थित केला जात आहे.

दरम्यान, माध्यम प्रतिनिधींनी वारंवार संपर्क साधूनही समाधानकारक प्रतिसाद न मिळाल्याने नाराजी वाढत आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे तातडीने लक्ष देऊन संबंधितांना आवश्यक सूचना कराव्यात व माध्यमांना माहिती देण्याची प्रक्रिया सुलभ करावी, अशी मागणी पत्रकार व नागरिकांकडून होत आहे.

No comments:

Powered by Blogger.