Header Ads

एका डिजिटल फलकाकडे सगळ्यांचे लक्ष वेधले.

 एका डिजिटल फलकाकडे सगळ्यांचे लक्ष वेधले.

-----------------------------

कळे प्रतिनिधी – सुनिल मोळे.

--------------------------

कळे : काटेभोगाव येथील यात्रेनिमित्त गावात विविध नेते, पुढारी तसेच संस्था व मंडळांचे डिजिटल फलक सर्वत्र झळकत होते. मात्र, या फलकांमध्ये बाबा रेडकर गो गीता सेवा संस्था यांचा फलक विशेष लक्षवेधी ठरला.

संस्थेच्या वतीने जागतिक आरोग्य दिन साधून यात्रेकरूंना आरोग्य दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या होत्या. फलकाच्या सुरुवातीलाच यात्रेकरूंचे स्वागत करण्यात आले होते. त्याखाली “व्यसन करत नाही म्हणा... तरच तुमचं, तुमच्या घराचं, गावाचं आणि देशाचं आरोग्य चांगलं राहील” असे प्रभावी घोषवाक्य लिहिण्यात आले होते.

या संदेशामुळे अनेक भाविक क्षणभर थांबून डिजिटल फलक वाचत होते आणि समाधानाने पुढे जात होते. यात्रेच्या गर्दीतही सामाजिक जाणीव जागवणारा हा उपक्रम ठरला.

हा उपक्रम राबविण्यासाठी संस्थेच्या अध्यक्षा आनंदी कांबळे तसेच सर्वोदय नेते आबा कांबळे यांनी पुढाकार घेतला.

No comments:

Powered by Blogger.