सरकारी रुग्णालयातील मोफत रक्त तपासणी बंद? नागरिकांत संताप, शासनाकडे मागणी
सरकारी रुग्णालयातील मोफत रक्त तपासणी बंद? नागरिकांत संताप, शासनाकडे मागणी
-----------------------------------------सातारा | प्रतिनिधी – अमर इंदलकर.
,-----------------------------------------
राज्यातील सरकारी रुग्णालयांमध्ये सुरू असलेली मोफत रक्त तपासणी सेवा अचानक बंद करण्यात आल्याची माहिती समोर येत असून, यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. विशेषतः वयोवृद्ध, आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि गोरगरीब रुग्णांना याचा मोठा फटका बसत आहे.
यापूर्वी सरकारी दवाखान्यांत लिपिड प्रोफाइल, HbA1c, कोलेस्ट्रॉल, ट्रायग्लिसराईड, युरिक ऍसिड यांसारख्या महत्त्वाच्या रक्त तपासण्या मोफत केल्या जात होत्या. मात्र, ही सुविधा अचानक बंद झाल्याने रुग्णांना खासगी लॅबकडे वळावे लागत असून, त्यासाठी मोठा खर्च करावा लागत आहे.
स्थानिक नागरिकांच्या मते, “गरीब रुग्णांना ही सुविधा मोठा आधार होती. आता तपासण्या महागड्या झाल्याने उपचारही अर्धवट राहण्याची भीती आहे.”
दरम्यान, या सेवा बंद होण्यामागे तांत्रिक अडचणी, निधीअभाव, तसेच प्रशासकीय कारणे असल्याची चर्चा सुरू आहे. मात्र, अधिकृत पातळीवर कोणतीही स्पष्ट माहिती देण्यात आलेली नाही.
👉 नागरिकांची ठाम मागणी:
शासनाने तात्काळ हस्तक्षेप करून मोफत रक्त तपासणी सेवा पुन्हा सुरू करावी, अन्यथा गरीब रुग्णांचे आरोग्य धोक्यात येईल.

No comments: