Header Ads

यवतमाळ जिल्ह्यातील पुसद उमरखेड महागांव तालुक्यांना पिक विमा तात्काळ मिळावा...संध्या रणवीर

 यवतमाळ जिल्ह्यातील पुसद उमरखेड महागांव तालुक्यांना पिक विमा तात्काळ मिळावा...संध्या रणवीर.

------------------------
पुसद तालुका प्रतिनिधी.

सिद्धार्थ कदम.

-----------------------

पुसद /महागांव दि 21 एप्रिल 

 महागाव, पुसद,उमरखेड या यवतमाळ जिल्ह्यातील अतिवृष्टी बाधित तालुक्याचा पिक विमा योजनेत समावेश करून  नुकसानभरपाई तात्काळ मिळावी अशी शेतकरी हितार्थ सौ संध्या संदेश रणवीर यांनी मुख्यमंत्री, व कृषिमंत्री, महाराष्ट्र शासन यांना निवेदन देऊन मागणी केली आहे.

 खरीप व रब्बी या दोन्हीही हंगामात तिन्ही तालुक्याचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे दोन्ही हंगामात शेतकऱ्यांच्या उत्पन्नात घट आलेली आहे.साहजिकच शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती गंभीर स्वरूपाची असल्याने व शेतकरी आत्महत्येचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या या जिल्ह्यात आर्थिक संकटाने शेतकरी आत्महत्येस प्रवृत्त होत असल्याने पीक विमा योजने अंतर्गत यवतमाळ जिल्ह्याला यातून वगळल्याने शेतकऱ्यात असंतोष आहे.

अतिवृष्टी,पावसाची अनियमितता व विविध नैसर्गिक संकटाचा सर्वाधिक फटका बसलेल्या यवतमाळ जिल्ह्याला या योजनेतून वगळण्यात आले असल्याचे निदर्शनास येत आहे ही बाब अन्यायकारक व शेतकऱ्यांच्या अडचणीत भर टाकणारी आहे. त्यामुळे या योजनेत यवतमाळ जिल्ह्याचा समावेश करून प्रामुख्याने महागाव, पुसद, उमरखेड या सर्वात जास्त फटका बसलेल्या तालुक्याला पिकविमा योजनेअंतर्गत पिकविमा रक्कम तात्काळ देण्याचे निर्देश संबंधित अधिकारी व पिक विमा कंपनीस देऊन सदरची प्रक्रिया प्रभावीपणे राबविण्यात यावी व पात्र असलेल्या शेतकऱ्यावर अन्याय होता कामा नये याकडे लक्ष देण्यात यावे असेही निवेदनात संध्या रणवीर यांनी नमूद केले आहे

No comments:

Powered by Blogger.