Header Ads

राधानगरीत गौण खनिज माफियांवर धडक कारवाई; तीन ट्रक जप्त, लाखोंचा दंड वसूल दुर्गमानवड परिसरात रात्रीच्या गस्तीत कारवाई; कायमस्वरूपी पोलीस चौकीची मागणी.

 राधानगरीत गौण खनिज माफियांवर धडक कारवाई; तीन ट्रक जप्त, लाखोंचा दंड वसूल

दुर्गमानवड परिसरात रात्रीच्या गस्तीत कारवाई; कायमस्वरूपी पोलीस चौकीची मागणी.

__________________________

राधानगरी प्रतिनिधी – विजय बकरे.

---------------------------------------

राधानगरी तालुक्यातील दुर्गमानवड व तळगाव-पिरळ मार्गावर अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतुकीवर महसूल विभागाने धडक कारवाई करत तीन ट्रक जप्त केले. या कारवाईत संबंधितांकडून लाखो रुपयांचा दंडही वसूल करण्यात आला असल्याची माहिती तहसीलदार श्रीमती अनिता देशमुख यांनी दिली.

दुर्गमानवड परिसरात अवैध उत्खननाच्या तक्रारी सातत्याने येत असल्याने महसूल विभागाने विशेष गस्त मोहीम राबवली. दोन दिवसांपूर्वी रात्री उशिरा करण्यात आलेल्या गस्ती दरम्यान अंधाराचा फायदा घेत सुरू असलेली बेकायदेशीर वाहतूक उघडकीस आली. तत्काळ कारवाई करत तीन ट्रक ताब्यात घेण्यात आले आणि संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.

या कारवाईत मंडळ अधिकारी गीते, कोरे तसेच तलाठी शेणवी यांनी सक्रिय सहभाग घेतला. त्यांच्या समन्वयामुळे ही कारवाई यशस्वीपणे पार पडली.

दरम्यान, दुर्गमानवड परिसरात अवैध उत्खनन रोखण्यासाठी कायमस्वरूपी पोलीस चौकी उभारण्याची गरज असल्याचे तहसीलदार अनिता देशमुख यांनी नमूद केले. बेकायदेशीर गौण खनिज उत्खनन व वाहतुकीविरोधात पुढेही कठोर कारवाई सुरूच राहील, असा इशाराही त्यांनी दिला.

No comments:

Powered by Blogger.