मुरगूडात सेवानिवृत्त शिक्षकाचे चार लाखांचे दागिने लांबवले....
मुरगूडात सेवानिवृत्त शिक्षकाचे चार लाखांचे दागिने लांबवले....
__________________________मुरगूड प्रतिनिधी/ जोतीराम कुंभार
----------------------------------------
मुरगूडच्या भरबाजारपेठेत मुरगूड पोलीस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावर सोमवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास एका भामट्याने येथील सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक विश्वनाथ भिवाजी शिंदे यांना फसवून त्यांच्या हातातील अर्ध्या तोळ्याच्या सोन्याच्या दोन अंगठ्या व गळ्यातील दीड तोळ्याची सोन्याची चेन असा चार लाख किंमतीच्या दागिन्यावर हातोहात डल्ला मारून पोबारा केला. भर दिवसा घडलेल्या या घटनेने बाजारपेठेत खळबळ उडाली.
येथील सेवानिवृत्त शिक्षक विश्वनाथ भिवाजी शिंदे यांचे पोलीस ठाण्याशेजारी घराचे बांधकाम सुरु आहे. तेथे बांधकामावर पाणी मारुन ते आपल्या बाजारपेठेतून सरपिराजीराव रोडवरील जुन्या घराकडे चालत निघाले होते.
बाजारपेठेतील गणपती मंदिर शेजारी एक भामटा समोरून आला व काका काल काय घडले तुम्हाला माहिती आहे की नाही ? असे म्हणून हातातील अंगठ्या व गळ्यातील चेन काढा, या कागदात पुडी बांधून खिशात ठेवा, असे म्हणत कागद पुढे केला. शिंदे यांनी क्षणाचाही विलंब न लावता सोन्याच्या दोन अंगठ्या व चेन काढून पुडीत बांधून खिशात ठेवत असताना त्या भामट्याने ठेवा लवकर म्हणत हातचलाखी करीत आपल्याकडील दागिन्याची पुडी त्यांच्या हातात देवून खऱ्या सोन्याची पुडी घेवून तो भामटा निघून गेला. मुरगूड पोलीसात फिर्याद दिली त्यानुसार चोरीची पोलिसात नोंद झाली आहे अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक क्रांती पाटील करीत आहेत.

No comments: