Header Ads

कोल्हापुरात सामाजिक बांधिलकीचा आदर्श; मोफत आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद.

 कोल्हापुरात सामाजिक बांधिलकीचा आदर्श; मोफत आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद.

----------------------------

कोल्हापूर प्रतिनिधी.

----------------------------

समाजाप्रती असलेली जबाबदारी जपत कोल्हापुरात कोरगावकर ग्रुप आणि रगेडियन फिटनेस क्लब, रंकाळा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मोफत आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

या शिबिरामध्ये जनरल फिजिशियन, फिजिओथेरपिस्ट, होमिओपॅथी तसेच ऑर्थोपेडिक तज्ज्ञांनी नागरिकांची सखोल तपासणी केली. यासोबतच बीपी, शुगर तपासणी तसेच हृदयविकारासंदर्भातील (कार्डिओलॉजी) मार्गदर्शनही देण्यात आले. त्यामुळे नागरिकांना एकाच ठिकाणी विविध आरोग्यसेवा उपलब्ध झाल्याने समाधान व्यक्त करण्यात आले.

शिबिराचे उद्घाटन नगरसेवक प्रतापसिंह जाधव, कोरगावकर ग्रुपचे प्रमुख आकाश कोरगावकर, राज कोरगावकर तसेच अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.

या उपक्रमात 100 हून अधिक नागरिकांनी सहभाग घेत आरोग्य तपासणी करून घेतली तसेच रक्तदान करून सामाजिक कार्यात योगदान दिले. सामाजिक बांधिलकी जपत राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

No comments:

Powered by Blogger.