Header Ads

कृष्णा नदीत बुडून ४३ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

 कृष्णा नदीत बुडून ४३ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू.

___________________________

कुपवाड मिरज :प्रतिनिधी राजु कदम.

---------------------------------------

सांगली शहर पोलीस स्टेशन हद्दीतील कृष्णा नदी परिसरातील स्वामी समर्थ घाट येथे पोहत असताना एका व्यक्तीचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली.

मयत व्यक्तीचे नाव सुमित सुरेश पावसकर (वय ४३, रा. टिळक चौक, पेठ भाग, सांगली) असे आहे.

या घटनेची माहिती सांगली शहर पोलीस ठाणे तसेच स्पेशल रेस्क्यू फोर्स (SRF) आपत्कालीन पथक व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यांना मिळताच तात्काळ घटनास्थळी धाव घेण्यात आली. घटनास्थळी पाहणी करत असताना आपत्कालीन परिस्थितीत स्थानिक नागरिकांनी मृतदेह पाण्याबाहेर काढला.

स्पेशल रेस्क्यू फोर्सच्या रुग्णवाहिकेतून मृतदेह सांगली सिव्हिल हॉस्पिटल येथे पाठवण्यात आला.

घटनास्थळी नातेवाईकांनी धाव घेऊन मयताची ओळख पटवली असून पुढील तपास सांगली शहर पोलीस ठाणे करीत आहे.

दरम्यान, कृष्णा नदीतील माई घाट व स्वामी समर्थ घाट येथे मोठ्या प्रमाणात नागरिक पोहण्यासाठी गर्दी करत असतात. तरीदेखील अशा दुर्दैवी घटना घडत असल्याने नागरिकांनी पाण्यात उतरताना आवश्यक ती खबरदारी घेणे अत्यंत गरजेचे आहे.

No comments:

Powered by Blogger.