शिवतीर्थ फिल्टर हाऊस येथे नवीन पाईपलाईन कामाचा शुभारंभ; पाणीपुरवठा होणार अधिक सक्षम.
शिवतीर्थ फिल्टर हाऊस येथे नवीन पाईपलाईन कामाचा शुभारंभ; पाणीपुरवठा होणार अधिक सक्षम.
----------------------
इचलकरंजी प्रतिनिधी :
लखन जाधव.
----------------------
आमदार डॉ. राहुल आवाडे यांच्या विशेष प्रयत्नांतून मंजूर झालेल्या शिवतीर्थ फिल्टर हाऊस येथील नवीन पाईपलाईन कामाचा शुभारंभ त्यांच्या हस्ते उत्साहात व दिमाखात संपन्न झाला.
शहरातील पाणीपुरवठा अधिक सक्षम व सुरळीत करण्याच्या दृष्टीने हा महत्त्वपूर्ण प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. विशेषतः उन्हाळ्यात जाणवणाऱ्या पाणीटंचाईवर कायमस्वरूपी उपाय म्हणून या पाईपलाईनचे नियोजन करण्यात आले असून, नव्या जलवाहिनीमुळे पाण्याची गळती कमी होऊन शुद्ध पाण्याचा दाब वाढण्यास मदत होणार आहे.
या प्रकल्पामुळे इचलकरंजी शहरासह आसपासच्या भागातील नागरिकांना नियमित, स्वच्छ आणि पुरेसा पाणीपुरवठा उपलब्ध होणार असून, पाणीपुरवठा व्यवस्थेत लक्षणीय सुधारणा होऊन नागरिकांच्या दैनंदिन जीवनात मोठी सोय निर्माण होणार आहे.
यावेळी महापौर, उपमहापौर, गटनेते, सभापती, नगरसेवक, नगरसेविका, प्रमुख पदाधिकारी तसेच नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments: