पेठवडगाव-वठार येथे नवीन बस स्थानकांचे उद्घाटन उत्साहात
पेठवडगाव-वठार येथे नवीन बस स्थानकांचे उद्घाटन उत्साहात.
-------------------------------
हातकणंगले तालुका प्रतिनिधी.
महेश कांबळे.
-----------------------------------
------------------
पेठवडगाव (ता. हातकणंगले) : पेठवडगाव व वठार येथील नव्याने उभारण्यात आलेल्या बस स्थानकांचा उद्घाटन समारंभ मोठ्या उत्साहात व दिमाखात पार पडला. राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते या बस स्थानकांचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी आमदार अशोकराव माने (बापू), वडगाव नगरीच्या नगराध्यक्ष विद्याताई पोळ, कुंभोज जिल्हा परिषद मतदार संघाच्या सदस्या शितल यादव तसेच माजी अर्थ व शिक्षण सभापती प्रवीण यादव (अण्णा) यांच्यासह इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नवीन बस स्थानकांमुळे परिसरातील प्रवाशांना अधिक सोयीस्कर, सुरक्षित व सुटसुटीत प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार असून, ग्रामीण भागातील वाहतूक व्यवस्थेला मोठा हातभार लागणार आहे. या प्रकल्पामुळे पेठवडगाव व वठार परिसराच्या विकासाला चालना मिळणार असल्याचे मान्यवरांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले.
कार्यक्रमास स्थानिक नागरिक, पदाधिकारी व विविध क्षेत्रातील मान्यवरांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली.

No comments: