कुपवाडमध्ये पाण्यासाठी वणवण! जुना मिरज रोड परिसरात भीषण टंचाई; महापालिका अन् लाभलेले उपमहापौरांचे दुर्लक्ष नगरसेवकांचे दुर्लक्ष
कुपवाडमध्ये पाण्यासाठी वणवण! जुना मिरज रोड परिसरात भीषण टंचाई; महापालिका अन् लाभलेले उपमहापौरांचे दुर्लक्ष नगरसेवकांचे दुर्लक्ष.
-----------------------------------कुपवाड :
येथील जुना मिरज रोड, पाण्याच्या टाकीजवळील परिसरात गेल्या काही दिवसांपासून पाण्याचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला आहे. भर उन्हाळ्यात नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी तीव्र त्रासाला सामोरे जावे लागत आहे. वेळेवर पाणी न येणे आणि आले तरी अत्यंत कमी प्रेशरने येणे, यामुळे स्थानिक रहिवासी पुरते हैराण झाले आहेत.
नागरिकांमध्ये तीव्र असंतोष
पाण्याच्या टाकीजवळच राहूनही नागरिकांना थेंब-थेंब पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. अनेक वेळा तक्रार करूनही पाणीपुरवठा वेळेवर केला जात नाही. कमी दाबामुळे (लो प्रेशर) उंचावरील घरांपर्यंत पाणी पोहोचतच नाही. यामुळे दैनंदिन कामे खोळंबली असून महिला वर्गातून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाची पाठ
या गंभीर समस्येकडे स्थानिक नगरसेवक आणि सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिका प्रशासनाने पूर्णपणे डोळेझाक केली आहे. निवडणुकांपुरते आश्वासन देणारे लोकप्रतिनिधी आता जनतेच्या मूलभूत समस्येकडे ढुंकूनही पाहत नसल्याचा आरोप येथील नागरिकांनी केला आहे. महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचेही या समस्येकडे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे.
"आम्ही नियमित पाणीपट्टी भरतो, तरीही आम्हाला पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. नगरसेवक आणि प्रशासनाने तात्काळ लक्ष घालून पाणीपुरवठा सुरळीत करावा, अशी अशा सर्वसामान्य जनतेतून व्यक्त होत आहे

No comments: