Header Ads

महाराष्ट्र राज्य एसटी महामंडळाचा 78 वा वर्धापन दिन , संभाजीनगर बस स्थानक येथे मोठ्या उत्साहात संपन्न...

 महाराष्ट्र राज्य एसटी महामंडळाचा 78 वा वर्धापन दिन , संभाजीनगर बस स्थानक येथे मोठ्या उत्साहात संपन्न.

------------------------------------
कोल्हापूर प्रतिनिधी विजय बकरे.
-----------------------------------


महाराष्ट्र राज्य एसटी महामंडळाचा 78 वा वर्धापण दिन संभाजीनगर बस स्थानक येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी संभाजीनगर एसटी आगाराची बस  ही बस फुगे लावून व बस सजवून संभाजीनगर बस स्थानकावर आणण्यात आली यावेळी या एसटी बसचे पूजन अशोक परीट सौ नीता परीट या प्रवासी जोडप्यांच्या हस्ते पूजन करण्यात आले त्यानंतर एस टी महामंडळाचा 78 वा वर्धापन दिनानिमित्त संभाजीनगर बस स्थानकावर रांगोळी काढण्यात आल्या होत्या त्यानंतर केक ज्येष्ठ प्रवासी पुरुष महिला यांच्या हस्ते कापण्यात आला यावेळी  संभाजीनगर एसटी आगार व्यवस्थापक दयानंद पाटील  यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार आला

या 78 व्या एसटी वर्धापन दिनाला संभाजीनगर एसटी आगार प्रमुख स्वप्नील पाटील बस स्थानिक प्रमुख सुरेश शिंगाडे कार्यशाळा अधीक्षक राहुल पाटील , सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक सौ रुतिका इंगवले वाहतूक निरीक्षक  अनिल सुतार दिलीप गावडे आगार लेखाकार पृथ्वीराज साळी इतर प्रशासकीय वर्ग कर्मचारी तांत्रिक कर्मचारी व प्रवासी वर्ग उपस्थित होता शेवटी प्रवाशांना साखर पेढे कर्मचाऱ्यांच्या वतीने वाटप करण्यात आले

No comments:

Powered by Blogger.