मार्केट यार्डात गांजाविक्रीचा डाव उधळला! शाहुपुरी पोलिसांची धडाकेबाज कारवाई; दोघांना अटक, ₹83 हजारांचा मुद्देमाल जप्त
मार्केट यार्डात गांजाविक्रीचा डाव उधळला! शाहुपुरी पोलिसांची धडाकेबाज कारवाई; दोघांना अटक, ₹83 हजारांचा मुद्देमाल जप्त...
-----------------------------शाहुपुरी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने मार्केट यार्ड परिसरात अंमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई करत गांजा विक्रीसाठी आलेल्या दोन संशयितांना अटक केली. या कारवाईत सुमारे १ किलो ११८ ग्रॅम गांजा, एक मोटारसायकल व दोन मोबाईल फोन असा एकूण ₹८३ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलीस अंमलदार राहुल यशवंत पाटील यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की, मार्केट यार्ड ते लोणार वसाहत रस्त्यावर दोन इसम गांजा विक्रीसाठी येणार आहेत. त्यानुसार शाहुपुरी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले.
झडतीदरम्यान ₹२१ हजार किमतीचा १ किलो ११८ ग्रॅम गांजा, ₹४० हजार किमतीची हिरो होंडा स्प्लेंडर (MH-09-V-7913), तसेच ₹२२ हजार किमतीचे सॅमसंग व रिअलमी कंपनीचे दोन मोबाईल फोन असा एकूण ₹८३ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे:
ओंकार रमेश कांबळे (वय 23), रा. आंबेडकर हौसिंग सोसायटी, पाडळी, ता. करवीर, जि. कोल्हापूर
पंकज बाबासो पाटील (वय 25), रा. शिवाजी चौक, वडगणे पाडळी, ता. करवीर, जि. कोल्हापूर
या प्रकरणी शाहुपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 494/2026 अन्वये गुंगीकारक औषधीद्रव्ये व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम (NDPS Act), 1985 मधील संबंधित कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल, पोलीस उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव, पोलीस उपअधीक्षक प्रिया पाटील, पोलीस निरीक्षक संतोष डोके, सहाय्यक पोलीस निरीक्षक शितलकुमार डोईजड, पोलीस उपनिरीक्षक आकाश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.

No comments: