Header Ads

राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबिर.

 राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबिर.

-------------------------------------
राधानगरी प्रतिनिधी विजय बकरे.
-------------------------------------

 राधानगरी :- समाजसुधारक आणि लोककल्याणकारी राजे म्हणून ओळख असलेल्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त राधानगरी पोलीस ठाणे महसूल विभाग व , राजश्री शाहू तालुका पत्रकार संघटना यांच्या पुढाकारातून भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती पत्रकार महेश तिरवडे यांनी दिली

"रक्तदान हेच श्रेष्ठदान" या उदात्त भावनेतून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमात परिसरातील युवकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन रक्तदानाद्वारे सामाजिक बांधिलकी जपावी, असे आवाहन करण्यात आले आहे. रक्ताच्या एका पिशवीमुळे अनेक रुग्णांना नवजीवन मिळू शकते. त्यामुळे या मानवतावादी कार्यात सहभागी होणे हीच राजर्षी शाहू महाराजांना खरी आदरांजली ठरणार आहे.

रक्तदान शिबिर अंबाबाई मंदिर मेन रोड राधानगरी येथे सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत आयोजित केले असून त्याचे उद्घाटन राधानगरी पोलीस स्टेशनचे पोलीस  निरीक्षक अजित सिंद व राधानगरीच्या तहसीलदार श्रीमती अनिता देशमुख शाहूवाडी चे डी वाय एस पी आप्पासाहेब पवार यांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे

विशेष म्हणजे, रक्तदान करणाऱ्या सर्व रक्तदातांना आयोजकांच्या वतीने आकर्षक वीस लिटर पाण्याचा जार भेट देण्यात येणार आहेत.

युवकांनी या संधीचा लाभ घेत समाजकार्यात आपले योग् दान चव्हाण असे आवाहन संयोजक पत्रकार महेश तिरवडे केले आहे

No comments:

Powered by Blogger.