गांजा विक्रीप्रकरणी सरवडेतील युवकावर गुन्हा; २० हजारांचा मुद्देमाल जप्त
गांजा विक्रीप्रकरणी सरवडेतील युवकावर गुन्हा; २० हजारांचा मुद्देमाल जप्त.
---------------------------------------राधानगरी तालुक्यातील सरवडे येथे गांजा अमली पदार्थाची विक्री केल्याप्रकरणी अक्षय अशोक सुतार (वय ३१) याच्याविरुद्ध राधानगरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सरवडे येथील कृष्णा कांबळे यांच्या घरात भाड्याने राहणारा अक्षय सुतार हा गांजा विक्री करत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार राधानगरी पोलिसांनी संबंधित ठिकाणी छापा टाकला.
या कारवाईत आरोपीकडून सुमारे १ किलो २० ग्रॅम गांजा, अंदाजे १८ हजार रुपये किमतीचा, ओप्पो कंपनीचा मोबाईल फोन, सिमकार्ड व रोख २२० रुपये असा एकूण २० हजार २२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
याप्रकरणी अक्षय सुतार याच्याविरुद्ध एनडीपीएस कायदा १९८५ अंतर्गत कलम ८(क) व २० अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. प्रकरणाचा पुढील तपास उपपोलीस निरीक्षक निवृत्ती खोत व हेडकॉन्स्टेबल एन. टी. देसाई करीत आहेत.

No comments: