Header Ads

लाच मागणीप्रकरणी शाहूपुरीच्या महिला पोलीस उपनिरीक्षकाविरुद्ध गुन्हा; अटक अद्याप नाही

 लाच मागणीप्रकरणी शाहूपुरीच्या महिला पोलीस उपनिरीक्षकाविरुद्ध गुन्हा; अटक अद्याप नाही

-----------------------------.
 शशिकांत कुंभार.
------------------------------
कोल्हापूर : शाहूपुरी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलीस उपनिरीक्षक अपर्णा सुखदेव जाधव यांच्याविरुद्ध लाच मागणीप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी) कोल्हापूरने केलेल्या पडताळणीत तक्रारदाराच्या वडिलांकडून यापूर्वी २५ हजार रुपये स्वीकारल्याचे मान्य करून आणखी २५ हजार रुपयांची मागणी केल्याचे निष्पन्न झाल्याचा दावा एसीबीने केला आहे.

तक्रारदाराविरुद्ध शाहूपुरी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याच्या तपासात तसेच जामिनासाठी मदत करण्याच्या मोबदल्यात ही रक्कम मागितल्याची तक्रार एसीबीकडे करण्यात आली होती. त्यानुसार पडताळणी केल्यानंतर अपर्णा जाधव यांच्याविरुद्ध शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.

ही कारवाई पोलीस उपआयुक्त तथा पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक वैष्णवी पाटील यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.

दरम्यान, गुन्हा दाखल झाला असला तरी आरोपी पोलीस उपनिरीक्षक अपर्णा जाधव यांना अद्याप अटक करण्यात आलेली नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली. पुढील तपास सुरू आहे.

No comments:

Powered by Blogger.