शेतकऱ्यांच्या कृषी पंपाच्या केबल चोरणारी आंतरराज्य टोळी जेरबंद; १५० शेतकऱ्यांच्या केबल हस्तगत करण्यात पोलिसांना यश
शेतकऱ्यांच्या कृषी पंपाच्या केबल चोरणारी आंतरराज्य टोळी जेरबंद; १५० शेतकऱ्यांच्या केबल हस्तगत करण्यात पोलिसांना यश.
आळेफाटा (प्रतिनिधी )
जुन्नर, आंबेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या कृषीपंपाच्या केबल चोरणाऱ्या आंतरराज्य टोळीला अटक करण्यात पोलिसांना यश आले असून १५० शेतकऱ्यांच्या केबल चोरीचे एकूण १२ गुन्हे उघड करण्यात आले आहेत.स्थानिक गुन्हे शाखा व नारायणगाव पोलिसांनी संयुक्त कारवाई करत या गुन्ह्याचा शोध लावला आहे.
जुन्नर, आंबेगाव तालुक्यामध्ये मागील काही दिवसात नदीच्या पात्रातील शेतकऱ्यांच्या कृषीपंपाच्या केबल वायर चोरीच्या घटना मोठ्या प्रमाणात झाल्या होत्या. ऐन उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या केबल चोरी होत असल्याने शेतकरी हैराण झाले होते. शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत होते. सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेत पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला सदर गुन्हे उघडकीस आणून लवकरात लवकर आरोपींना अटक करण्याच्या सूचना दिल्या होत्या.
या गुन्ह्यांचा स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि महादेव शेलार, सहा. पोलीस फौजदार दिपक साबळे, पो. हवालदार वारे, पो. शिपाई नवले, मोटे अशा पथकामार्फत समांतर तपास करत असताना विविध ठिकाणच्या घटनास्थळाला भेट दिली असता हे गुन्हे एकच टोळी करत असल्याचे लक्षात आले.गुन्हे शाखेच्या पथकाला गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की अशा प्रकारचे गुन्हे हे मध्य प्रदेश राज्यातील आरोपी करत असून ते चोरी करण्याच्या ठिकाणच्या आसपास येऊन राहतात व रात्रीच्या वेळी अशा चोऱ्या करतात व सध्या ते नाशिक येथील घोटी गावच्या हद्दीत वास्तव्यास आहेत. मिळालेल्या माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या पथकाने नारायणगाव पोलीस स्टेशन पथकासह घोटी, नाशिक येथे सापळा लाऊन संशयित आरोपी ताब्यात घेतले.
आरोपी १) आरज्या छत्तेसिंग पवार वय १९ रा. कुडे, पोस्ट हरदुआ ता/जिल्हा कटनी, मध्य प्रदेश २) गगन शापिलाल चौहान वय १९ रा. येडियाव पो. छनेरा, हरसूल जिल्हा, खंडवा, मध्य प्रदेश ३) अतुल शापिलाल चौहान वय २१ रा. येडियाव पो. छनेरा, हरसूल जिल्हा, खंडवा, मध्य प्रदेश ४) तपसलाल सर्कस पवार वय ५० रा.कुडे, पोस्ट हरदुआ ता/जिल्हा कटनी, मध्य प्रदेश ५) सुरज रामसर आदिवासी वय ४० रा. बुढा देवगाव ता.रेठी जि. कटणी, मध्य प्रदेश यांच्याकडे गुन्हाबाबत चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्या ताब्यातून जवळपास १५० शेतकऱ्यांच्या केबल वायर जप्त करण्यात आल्या असून केबल चोरीचे खालील गुन्हे उघडकीस आले आहेत.
हे आरोपी सध्या नारायणगाव पोलीस स्टेशन कस्टडी मध्ये असून ही कार्यवाही पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदिप गिल्ल, अप्पर पोलीस अधीक्षक शुभम कुमार, उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल मांडवे, धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर
सपोनि. महादेव शेलार,
सपोनि. प्रविण सपांगे
सफौ.दीपक साबळे,पोहवा. राजू मोमिन, संदीप वारे, अक्षय नवले,अभिमन्यू मोटे, शरद बांबळे,अतुल डेरे,संदीप फड,निलेश सुपेकर, स्वप्निल गाढवे, नारायणगाव पोलिस ठाण्यातील मंगेश लोखंडे, सत्यम केळकर, टीलेश जाधव, सोमनाथ डोके, आदिनाथ लोखंडे, संतोष कोकणे यांनी केली आहे.

No comments: