Header Ads

कर तोडणीच्या जल्लोषाने कौलव दुमदुमले! पारंपरिक थाटात सजलेल्या बैलांनी वेधले सर्वांचे लक्ष

कर तोडणीच्या जल्लोषाने कौलव दुमदुमले! पारंपरिक थाटात सजलेल्या बैलांनी वेधले सर्वांचे लक्ष

------------------------------------------
राधानगरी | प्रतिनिधी : विजय बकरे
------------------------------------------


राधानगरी तालुक्यातील कौलव येथे ग्रामीण संस्कृतीचा वारसा जपणारा पारंपरिक 'कर तोडणी' कार्यक्रम उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. सजवलेल्या बैलजोड्या, हलगीचा कडकडणारा नाद, पारंपरिक वाद्यांचा गजर आणि बैल शौकिनांची प्रचंड गर्दी यामुळे संपूर्ण गाव उत्सवमय झाले होते.
कौलव गावामध्ये ऐतिहासिक काळापासून सखाराम पाटील घराण्याकडे पाटीलकीचा मान असून, यंदाही हा बहुमान परंपरेनुसार मोठ्या आदराने पार पाडण्यात आला. गावातील या पारंपरिक सोहळ्याला सांस्कृतिक वैभव लाभले.
उत्सवासाठी बैलजोड्या आकर्षक पद्धतीने सजवण्यात आल्या होत्या. गळ्यात घुंगुरमाळा, शिंगांना बेगड आणि पाठीवर रंगीबेरंगी नक्षीदार झुल पांघरलेल्या बैलांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. हलगीच्या ठेक्यावर बैल शौकिनांचा उत्साह शिगेला पोहोचला होता.
या सोहळ्याचे दर्शन घेण्यासाठी कौलवसह परिसरातील अनेक गावांतील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनी उत्सवाचा मनमुराद आनंद लुटला. हलगीचा गजर, पारंपरिक घोषणाबाजी आणि ग्रामीण संस्कृतीचे जिवंत दर्शन यामुळे संपूर्ण कौलव परिसर दुमदुमून गेला.
ग्रामीण परंपरा, शेती संस्कृती आणि बैलांप्रती असलेला जिव्हाळा जपणारा 'कर तोडणी' हा सोहळा यंदाही मोठ्या थाटामाटात, उत्साहात आणि शांततेत संपन्न झाला.

No comments:

Powered by Blogger.