Header Ads

निमसाखरमध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांची वटपौर्णिमा भक्तिमय वातावरणात उत्साहात साजरी,

 निमसाखरमध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांची वटपौर्णिमा भक्तिमय वातावरणात उत्साहात साजरी.

निमसाखरमध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांची वटपौर्णिमा भक्तिमय वातावरणात उत्साहात साजरी.

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

इंदापूर तालुका प्रतिनिधी : गणेश धनवडे.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

निमसाखर (ता. इंदापूर) : निमसाखर गावात श्री स्वामी समर्थ महाराजांची वटपौर्णिमा भक्तिमय वातावरणात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. वटपौर्णिमेनिमित्त श्री दत्त मंदिरातून श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पालखीची गावातून भव्य ग्रामप्रदक्षिणा काढण्यात आली. या पालखी सोहळ्यास महादेव भजनी मंडळाने मोलाचे सहकार्य केले.

ग्रामप्रदक्षिणेदरम्यान स्वामीभक्त महिलांनी आपल्या घरासमोर तसेच चौकाचौकात आकर्षक रांगोळ्या काढून आणि फुलांची उधळण करून श्री स्वामी समर्थांच्या पालखीचे भक्तिभावाने स्वागत केले. संपूर्ण गाव "श्री स्वामी समर्थ" नामघोषाने दुमदुमून गेला.

पालखी मंदिरात परतल्यानंतर ह.भ.प. रमेश महाराज कट्टे (वालचंदनगर) यांनी श्री स्वामी समर्थ चरित्रावर प्रेरणादायी प्रवचन केले. त्यानंतर स्वामी समर्थांचा सामूहिक जप, आरती आणि भक्तिमय कार्यक्रम पार पडला.

या सोहळ्यात पालखीची आकर्षक सजावट श्री राजेंद्र मारुती घोडे यांनी केली, तर मंदिरातील सुंदर रांगोळीची सेवा सौ. शितल सुनील टकले यांनी बजावली. कार्यक्रमाच्या समारोपानंतर श्री महेश सुभाष माने यांच्या वतीने सर्व स्वामीभक्तांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमासाठी वालचंदनगर येथील स्वामीभक्त श्री राम कुंभार सर यांनी विशेष उपस्थिती लावली. तसेच गावातील आणि परिसरातील मोठ्या संख्येने स्वामीभक्त उपस्थित राहून वटपौर्णिमा सोहळा भक्तिभावाने साजरा केला.

No comments:

Powered by Blogger.