Header Ads

"पन्हाळगडावर ऊन-पावसाचा लपंडाव""पर्यटकांची तारांबळ..." पावसाळ्यात पन्हाळ्याचे रूपडे पालटले,..क्षणात ऊन क्षणात धुके....

 "पन्हाळगडावर ऊन-पावसाचा लपंडाव""पर्यटकांची तारांबळ..."  पावसाळ्यात पन्हाळ्याचे रूपडे पालटले,..क्षणात ऊन क्षणात धुके....

-----------------------------
पन्हाळा-माधुरी मस्कर.
----------------------------

"कोल्हापूर जिल्ह्यातील ऐतिहासिक पन्हाळगडावर सध्या निसर्गाचा अनोखा खेळ सुरू आहे. सकाळी कडक ऊन, दुपारी अचानक रिमझिम आणि सायंकाळी दाट धुके. ऊन-पावसाच्या या लपंडावामुळे गडाचे सौंदर्य खुलले असले तरी पर्यटकांची मात्र तारांबळ उडतेय. हवामान खात्याने पुढचे 2 दिवस हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज वर्तवला आहे...

ऐतिहासिक पन्हाळगडावर आज सकाळपासून ऊन पावसाचा खेळ सुरू आहे. सुरू असलेल्या या ऊन-पावसाच्या खेळामुळे पर्यटकांची एकच तारंबळा उडाली होती. सकाळपासून पन्हाळा गडावर चांगलीच उघडीप होती त्यानंतर दुपारी दोन वाजल्यापासून पावसाने सुरुवात केली काही क्षणात पाऊस थांबला व लगेच ऊन पडले असा हा लपंडाव दिवसभर सुरू होता.. त्यामुळे काही पर्यटकांनी हातामध्ये छत्री घेऊन फिरणे पसंत केले.. सकाळपासून दुपारपर्यंत कडक ऊन त्यानंतर पावसाची रिमझिम व सायंकाळी दाट धुकं यामुळे पन्हाळगडाचे सौंदर्य अधिकच खुलून दिसत होते. पर्यटनासाठी आलेल्या अनेक पर्यटकांनी पन्हाळा गडावरील रिमझिम पावसाचा सुखद अनुभव घेतला.. तर काहींना पावसातील व धुक्यामधील सेल्फी घेण्याचा मोह आवरता आला नाही...

No comments:

Powered by Blogger.