Header Ads

मलकापूर जलशुद्धीकरण केंद्रातील ४६ लाखांच्या विकासकामांचे उद्घाटन आमदार विनय कोरे

 मलकापूर जलशुद्धीकरण केंद्रातील ४६ लाखांच्या विकासकामांचे उद्घाटन आमदार विनय कोरे.

-----------------------------------
मलकापूर प्रतिनिधी रोहित पास्ते: 
------------------------------------

 मलकापूर नगरपरिषदेच्या जलशुद्धीकरण केंद्रातील सुमारे ४६ लाख रुपये खर्चाच्या विविध विकासकामांचे उद्घाटन आमदार विनय कोरे यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले. या विकासकामांमुळे शहरातील पाणीपुरवठा व्यवस्था अधिक सक्षम होण्यास मदत होणार असून नागरिकांना स्वच्छ व शुद्ध पाणी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.

यावेळी बोलताना आमदार विनय कोरे यांनी मलकापूर नगरपरिषद क्षेत्रातील नागरिकांच्या पाणीपुरवठा व इतर मूलभूत सुविधांसाठी आवश्यक निधी मंजूर करण्यात आल्याचे सांगितले. त्यामुळे शहरातील जलशुद्धीकरण प्रकल्पासह विविध विकासकामांना गती मिळणार असून नागरिकांच्या दैनंदिन जीवनमानात सकारात्मक बदल घडून येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या कार्यक्रमास जनसुराज्य शक्तीचे कोल्हापूर जिल्हा परिषदेचे गटनेते सर्जेराव दादा पाटील (पेरीडकर), प्रकाश तातोबा पाटील, नगराध्यक्षा रश्मी शंतनु कोठावळे, उपनगराध्यक्ष दिलीप आनंदा पाटील, माजी नगराध्यक्ष अमोल केसरकर, बाबासाहेब पाटील, नगरसेवक ओम भोपळे, महेंद्र कोठावळे, किरण घेवदे, भगवानराव सपाटे, खंडू पळसे, दादासो नाईक, नगरसेविका गीता पाटील, गिरीजा कोकरे-देसाई, सुरेखा कांबळे, मुख्याधिकारी चेतनकुमार धनाप्पा माळी, शंतनु कोठावळे, माजी नगरसेवक किशोर सनगर, किसन चांदणे यांच्यासह सर्व नगरसेवक, पदाधिकारी आणि नगरपरिषद कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शहरातील पाणीपुरवठा व्यवस्था अधिक कार्यक्षम करण्यासाठी राबविण्यात आलेली ही विकासकामे भविष्यात मलकापूरच्या सर्वांगीण विकासाला चालना देणारी ठरणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

No comments:

Powered by Blogger.