Header Ads

बेकायदा ताडी विक्री करणाऱ्यावर गुन्हा दाखल, ३३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त.

 बेकायदा ताडी विक्री करणाऱ्यावर गुन्हा दाखल, ३३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त.

------------------------------

आळेफाटा प्रतिनिधी 

कैलास बोडके

------------------------------

जुन्नर तालुक्यातील मढ गावात बेकायदेशीरपणे ताडी विक्री करणाऱ्या एका इसमावर ओतुर पोलिसांनी कारवाई केली आहे. या कारवाईत ११० पिशव्या ताडी जप्त करण्यात आली असून आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. १२ जून रोजी दुपारी १:२५ वाजता मढ(ता. जुन्नर )येथे अहील्यानगर-कल्याण रस्त्यालगत असलेल्या आंब्याच्या झाडाच्या आडोशाला ही कारवाई करण्यात आली. पोलीस अंमलदार संपत भालेकर यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिस पथकाने छापा टाकला असून 

*रविंद्र दशरथ भंडारी (वय 40, रा. उदापुर, ता. जुन्नर)* हा पांढऱ्या रंगाच्या गोणीत ताडीच्या पिशव्या बाळगून विक्री करण्याच्या तयारीत आढळून आला. त्याच्याकडून प्रत्येकी 30 रुपये किमतीच्या एकूण 110 प्लास्टिक पिशव्या, म्हणजेच *3300 रुपये किमतीची ताडी* जप्त करण्यात आली.


आरोपीविरुद्ध ओतुर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार बाळशीराम भवारी करीत आहेत. 

पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल, अप्पर पोलीस अधीक्षक शुभम कुमार जुन्नर उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील यांच्या सूचनेनुसार 

ओतुर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर बाजगिरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे.

No comments:

Powered by Blogger.