डुंबरवाडीत रुग्णसेवेसाठी अल्पदरात स्वामी भक्तांसाठी रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा संपन्न.
डुंबरवाडीत रुग्णसेवेसाठी अल्पदरात स्वामी भक्तांसाठी रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा संपन्न.
-----------------------------------
आळेफाटा प्रतिनिधी
कैलास बोडके
-----------------------------------
ह.भ.प. चंद्रकांत महाराज डुंबरे यांच्या प्रेरणेतून समाजोपयोगी उपक्रम
*डुंबरवाडी, पुणे :* श्री स्वामी समर्थ भक्ती शक्ती मंदिर सेवा समिती, डुंबरवाडी यांच्या वतीने रुग्णसेवेसाठी समर्पित रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण ह. भ. प विठ्ठल महाराज शितोळे यांच्या प्रवचनाच्या
भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.
माळशेज नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, ठाणे यांच्या सहकार्याने हा सेवाभावी उपक्रम राबविण्यात आला. रुग्णवाहिका व्यवस्थापनाची जबाबदारी खामुंडी येथील सामाजिक कार्यकर्ते कैलास बोडके व एम डी ऍम्ब्युलन्सचे संस्थापक दिपक मंडलिक यांनी स्वीकारली आहे.
या कार्यक्रमाचे लोकार्पण डुंबरवाडीच्या लोकनियुक्त सरपंच शीतल गोरे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने स्वामी भक्त, ग्रामस्थ, देणगीदार आणि सेवेकरी उपस्थित होते.
हा संपूर्ण उपक्रम ह.भ.प. चंद्रकांत महाराज डुंबरे यांच्या प्रेरणेतून व आशीर्वादाने साकार झाला. महाराजांच्या उदात्त विचारांमुळे आणि सततच्या मार्गदर्शनामुळे हे समाजोपयोगी कार्य पूर्णत्वास गेले, अशी भावना सेवा समितीच्या सदस्या सेवा निवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी सुशीला डुंबरे यांनी व्यक्त केली.
सेवा समितीच्या वतीने सांगण्यात आले की, "ही रुग्णवाहीका सेवा अनेक गरजू रुग्णांसाठी संजीवनी ठरेल. अडचणीच्या काळात ही सेवा आधारवड म्हणून काम करेल."
स्वामी कृपेने महाराजांच्या हातून अशीच समाजहिताची व लोककल्याणाची कार्ये निरंतर घडत राहोत, अशी प्रार्थना यावेळी करण्यात आली. उपस्थित सर्व मान्यवर, ग्रामस्थ आणि देणगीदारांचे सेवा समितीने आभार मानले.
ही सेवा ग्रामीण भागातील रुग्णांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार असल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.

No comments: