कोल्हापुरात दिवसाढवळ्या मंगळसूत्र चोरी; पत्ता विचारण्याच्या बहाण्याने महिलेला लुटले.
कोल्हापुरात दिवसाढवळ्या मंगळसूत्र चोरी; पत्ता विचारण्याच्या बहाण्याने महिलेला लुटले.
------------------------------
कोल्हापूर प्रतिनिधी
रहिम पिंजारी
------------------------------
कोल्हापूर:शहरातील रंकाळा परिसरात दिवसाढवळ्या चोरीची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इस्कॉन मंदिर ते अंबाई टँक रोडवर भाजी घेऊन घरी जाणाऱ्या एका ७४ वर्षीय ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील १ लाख रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र दोन चोरट्यांनी लंपास केले.
नेमकी घटना काय?
फिर्यादी शकुंतला विजय कोल्हापुरे (वय ७४, रा. अंबाई टँक) या ११ मे २०२६ रोजी सकाळी ११:०० च्या सुमारास इस्कॉन मंदिर परिसरातून भाजी घेऊन पायी घरी जात होत्या. त्या नवनाथ अपार्टमेंटसमोर आल्या असता, एका काळ्या रंगाच्या 'यामहा एफ झेड' सारख्या दुचाकीवरून दोन तरुण तिथे आले. पत्ता विचारण्याच्या बहाण्याने त्यांनी दुचाकी महिलेच्या जवळ नेली आणि काही कळायच्या आत त्यांच्या गळ्यातील १८ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र जोरात हिसकावून पोबारा केला.
चोरट्यांचे वर्णन:
मिळालेल्या माहितीनुसार, चोरी करणाऱ्या दोन तरुणांचे वर्णन खालीलप्रमाणे आहे:
१. चालक: वय अंदाजे १९ ते २० वर्षे, सडपातळ बांधा, सावळा रंग. अंगात गुलाबी-पांढऱ्या चेकचा शर्ट आणि आकाशी रंगाची जीन्स पँट होती.
२. मागे बसलेला तरुण: वय अंदाजे २३ ते २४ वर्षे, मध्यम बांधा, रंगाने काळा-सावळा आणि लांब केस. त्याने काळ्या किंवा निळ्या रंगाचे जॅकेट आणि आकाशी रंगाची जीन्स पँट घातली होती.
पोलिस तपास सुरू:
या प्रकरणी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३०९(४), ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध घेतला जात आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस हवालदार मोरे करत आहेत.
भरवस्तीत आणि दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, �

No comments: