Header Ads

बँकॉक येथील आंतरराष्ट्रीय परिषदेत डॉ. सुनील एन. खाडे यांना 'Excellence Research Award' पुरस्कार प्रदान.

 बँकॉक येथील आंतरराष्ट्रीय परिषदेत डॉ. सुनील एन. खाडे यांना 'Excellence Research Award' पुरस्कार प्रदान.

----------------------------
सिद्धार्थ कदम
पुसद तालुका प्रतिनिधी.
----------------------------

फुलसिंग नाईक महाविद्यालयातील प्राणिशास्त्र विभागाचे सहयोगी प्राध्यापक तथा विभागप्रमुख डॉ. सुनील एन. खाडे यांना बँकॉक (थायलंड) येथे आयोजित करण्यात आलेल्या १० व्या आंतरराष्ट्रीय "क्लायमेट स्मार्ट नॅचरल रिसोर्सेस मॅनेजमेंट फॉर सस्टेनेबल अॅग्रीकल्चर अँड अलाइड सायन्सेस" परिषदेत "Excellence Research अवॉर्ड-२०२६" या प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

हा पुरस्कार डॉ. बिनय कुमार चक्रवर्ती (ढाका, बांगलादेश), डॉ. रमेश राठोड (रायचूर, कर्नाटक), डॉ. उपेंद्र सिंग (जयपूर, राजस्थान), डॉ. जोगिंदर सिंग, डॉ. अनंत कुमार (अध्यक्ष, ए.टी.डी.एस., गाझियाबाद, उत्तर प्रदेश) तसेच डॉ. देवांशु गुप्ता (शास्त्रज्ञ, भारतीय प्राणी सर्वेक्षण, कोलकाता) यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र प्रदान करून देण्यात आला.

डॉ. सुनील एन. खाडे यांनी या परिषदेत तांत्रिक सत्राच्या (Session Chair) म्हणूनही जबाबदारी पार पाडली. पर्यावरण, प्राणीशास्त्र आणि शाश्वत विकास क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन डॉ. सुनील एन. खाडे यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला. त्यांच्या या यशामुळे फुलसिंग नाईक महाविद्यालयासह संपूर्ण यवतमाळ जिल्ह्याच्या शैक्षणिक क्षेत्राचा गौरव वाढला आहे.

ही आंतरराष्ट्रीय परिषद ०५ ते ०८ जून २०२६ रोजी एशियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (ए.आय.टी.), बँकॉक, थायलंड येथे आयोजित करण्यात आली होती. परिषदेत हवामान बदल, नैसर्गिक संसाधनांचे व्यवस्थापन, शाश्वत शेती आणि पर्यावरणीय शाश्वतता या विषयांवर विविध देशांतील संशोधकांनी आपले संशोधन सादर केले.

या परिषदेत थायलंड, बांगलादेश, नेपाळ, पाकिस्तान, श्रीलंका आणि भारत येथील विविध शास्त्रज्ञ, संशोधक तसेच प्राध्यापक उपस्थित होते. तथा महाराष्ट्रातील विविध महाविद्यालयांचे प्राध्यापक तथा शास्त्रज्ञ उपस्थित होते. त्यामध्ये डॉ. तनवीर पठाण, डॉ. पी. आर. मोरे, डॉ. प्रियंका गायकवाड, डॉ. अशोक मुंडे, डॉ. संतोष रणखांब, डॉ. रामहरी मायकर, डॉ. विकास कल्याणकर, युवा शास्त्रज्ञ रणजित राऊत, डॉ. यास्मिन शेख, डॉ. संगीता डोंगरे, आणि डॉ. आयेशा दुर्रानी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

डॉ. सुनील एन. खाडे यांच्या या आंतरराष्ट्रीय यशाबद्दल शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. जयभाऊ नाईक, मार्गदर्शक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रल्हाद वावरे, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक प्रा. डॉ. व्ही. एन. कांबळे, सहकारी प्राध्यापक, विद्यार्थी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

No comments:

Powered by Blogger.