२१ ऑगस्ट जलसंधारण दिन म्हणून घोषित (ना. इंद्रनील नाईक यांच्या पाठपुराव्याला यश) ... जलसंधारणाच्या चळवळीला नवी प्रेरणा...
२१ ऑगस्ट जलसंधारण दिन म्हणून घोषित (ना. इंद्रनील नाईक यांच्या पाठपुराव्याला यश) ... जलसंधारणाच्या चळवळीला नवी प्रेरणा...
---------------------------------पुसद - महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा जलक्रांतीचे प्रणेते आणि जल पुरुष म्हणून ओळख असलेले सुधाकरराव नाईक यांचा 21 ऑगस्ट हा जन्मदिवस आता महाराष्ट्र शासनाच्या वतीने जलसंधारण दिन म्हणून उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.
आज शासनाच्या वतीने परिपत्रक काढून सुधाकरराव नाईक यांचा 21 ऑगस्ट हा जन्मदिवस जलसंधारण दिन म्हणून घोषित करण्यात आला आहे.
या मागणीसाठी राज्याचे राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी या मागणीसाठी अनेक वेळा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी सकारात्मक चर्चा करून जलसंधारण खात्याची निर्मिती करून महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम करण्यासाठी धडपडणारे सुधाकरराव नाईक यांच्या प्रति कृतज्ञता आणि जलसंधारणाच्या चळवळीला नवी प्रेरणा मिळण्यासाठी सुधाकरराव नाईक यांचा जन्मदिवस जलसंधारण दिवस म्हणून साजरा व्हावा अशी मागणी करण्यात आली होती.
या प्रेरणादायी व राज्य शासनाची कृतज्ञता सिद्ध करणाऱ्या मागणीचा सकारात्मक विचार करून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जलसंधारण सचिवालयाच्या वतीने परिपत्रक काढून 21 ऑगस्ट हा दिवस जलसंधारण दिवस म्हणून घोषित केला आहे.
या निर्णयामुळे जलसंधारणाच्या चळवळीला नवी प्रेरणा मिळणारा असून सुधाकरराव नाईक यांच्यावर प्रेम करणाऱ्या महाराष्ट्रातील जनतेने व जलसंधारणाच्या चळवळीमध्ये काम करणाऱ्या संघटनेने शासनाच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे.
यावर्षीपासून 21 ऑगस्ट हा दिवस जलसंधारण दिन म्हणून राज्यभरात साजरा करून सुधाकरराव नाईक यांच्या स्मृतीला उजाळा देऊन ही जलसंधारणाची चळवळ अधिक प्रभावी रित्या राबविल्या जाणार आहेत.
ना. इंद्रनील नाईक यांनी १ मे २०२६ ला या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांची भेट घेऊन या दिनाचे महत्त्व अधोरेखित करून 21 ऑगस्ट हा दिवस जलसंधारण दिन म्हणून साजरा व्हावा आणि महाराष्ट्र शासनाकडून घोषित व्हावा यासाठी मागणी केली होती.
या मागणीचा तत्परतेने विचार करून मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी अवघ्या दोन महिन्यात अर्थात 3 जुलै 2026 ला 21 ऑगस्ट हे जलसंधारण दिन म्हणून घोषित करून त्यासंदर्भात परिपत्रक काढल्यामुळे सुधाकरराव नाईक यांच्यावर प्रेम करणाऱ्या नाईक प्रेमी मंडळींमध्ये आनंदाचे व उत्साहाचे वातावरण आहे.

No comments: