Header Ads

जुन्नर तालुक्यातील खामुंडीच्या लेकीची पुणे कारागृह पोलीस पदी निवड

 जुन्नर तालुक्यातील खामुंडीच्या लेकीची पुणे कारागृह पोलीस पदी निवड.


आळेफाटा (प्रतिनिधी )खामुंडी (ता. जुन्नर)येथील  शेतकरी शांतराम शिंगोटे यांची कन्या  विद्या शांताराम शिंगोटे हिची पुणे कारागृह पोलीस पदी निवड झाली आहे. 

विद्या हिने सह्याद्री करिअर अकॅडमीमध्ये पोलीस भरतीचे प्रशिक्षण घेतले होते. ग्रामीण भागातील अत्यंत गरीब शेतकरी कुटुंबातून आलेल्या विद्याने जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर हे यश संपादन केले आहे. तिच्या या यशाबद्दल खामुंडी गावासह संपूर्ण जुन्नर तालुक्यातून तिचे अभिनंदन होत आहे.

शेतकरी कुटुंबातील मुलगी पोलीस दलात दाखल झाल्याने परिसरातील युवतींना निश्चितच प्रेरणा मिळणार आहे. विद्या शिंगोटे हिने यशाचे श्रेय आई-वडील, सह्याद्री करिअर अकॅडमीचे मार्गदर्शक  मयुर डुंबरे, गीताराम गायकर, आई अलका शिंगोटे, बाबा नामदेव शिंगोटे,आज्जी बबाबाई शिंगोटे व ग्रामस्थांना दिले आहे. तिच्या पुढील वाटचालीसाठी सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

No comments:

Powered by Blogger.