दाजीपूर प्राथमिक आरोग्य, वादळी वाऱ्याने केंद्राच्या इमारतीचे पत्र उडाले ते तातडीने बसवण्याच्या आदेश.
दाजीपूर प्राथमिक आरोग्य, वादळी वाऱ्याने केंद्राच्या इमारतीचे पत्र उडाले ते तातडीने बसवण्याच्या आदेश जि प आरोग्य व बांधकाम सभापती सौ सारिका नांदेकर.
--------------------------------------राधानगरी तालुक्यातील दाजीपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्र च्या इमारतीवरील पावसाच्या वादळी वाऱ्याने पत्रे उडून गेल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्या असून यासंदर्भात कोल्हापूर जिल्हा परिषदेचे आरोग्य व बांधकाम सभापती सौ सारिका नांदेकर यांनी नुकतीच भेट देऊन तातडीने दुरुस्त करण्याच्या सूचना बांधकाम विभागाला दिले आहेत
पश्चिम भागात मोठ्या प्रमाणात पाऊस चालू असल्याने त्या ठिकाणी वादळी वाऱ्याने दाजीपूर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीवरील पत्रे उडून गेल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून या संदर्भात कोल्हापूर जिल्हा परिषदेचे आरोग्य व बांधकाम सभापती सौ सारिका नांदेकर यांनी तातडीने प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट देऊन त्या ठिकाणी पाहणी करून बांधकाम विभागास तातडीने बजेट मंजूर करून प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीवरील पत्रे बसवण्यात यावेत अशा आदेश बांधकाम विभागाला देण्यात आला आहे
यावेळी राधानगरी पंचायत समितीचे सभापती आर वाय पाटील सदस्य मोहन पाटील बांधकाम विभागाचे विनायक खोत फेजीवडे माजी सरपंच हसन राऊत पंचायत समितीच्या आरोग्य अधिकारी आर आर शेटे व दाजीपूर परिसरातील कार्यकर्ते हजर होते

No comments: