Header Ads

वृक्षारोपणातून जपली जाणार आईची माया; पुसदमध्ये " एक पेड माँ के नाम,' उपक्रमाचा शानदार प्रारंभ.

 वृक्षारोपणातून जपली जाणार आईची माया; पुसदमध्ये " एक पेड माँ के नाम,' उपक्रमाचा शानदार प्रारंभ.

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
सिद्धार्थ कदम -पुसद तालुका प्रतिनिधी.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

पुसद :- वाढत्या तापमानावर मात करण्यासाठी आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी 'माणुसकीची भिंत सोशल फाउंडेशन, पुसद'च्या वतीने "'एक पेड माँ के नाम' या अत्यंत कौतुकास्पद आणि नाविन्यपूर्ण उपक्रमाची सुरुवात दिनांक ५ जुलै रोजी करण्यात आली. या अभियानांतर्गत नागरिकांना आपल्या आईच्या नावाने एक झाड लावून त्याचे दत्तक म्हणून संगोपन करण्याचा संदेश देण्यात आला आहे.

झाड लावण्यासोबतच ते जगवणे ही काळाची गरज,

या उपक्रमाची पार्श्वभूमी सांगताना संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, निसर्ग हा आईसारखाच असतो, जो कोणताही भेदभाव न करता सर्वांना भरभरून देतो. आज वाढत्या वृक्षतोडीमुळे उन्हाळ्यातील तापमानाने सर्व रेकॉर्ड तोडले आहेत. अशा परिस्थितीत केवळ झाडे लावणे सोपे आहे, पण उन्हाळ्यात त्यांना पाणी देऊन जगवणे कठीण झाले आहे. जर प्रत्येकाने आपल्या आईच्या हाताने किंवा तिच्या आठवणीत एक झाड लावून ते जगवण्याचा संकल्प केला, तर वृक्ष नक्कीच वाचतील. यापुढे 'माणुसकीची भिंत मदत केंद्र' येथे अन्नदानाची तारीख उपलब्ध नसेल, तेव्हा अन्नदात्यांना त्यांच्या आईच्या नावाने झाड लावण्याचा आग्रह संस्थेचे सदस्य करणार आहेत.

वडिलाधाऱ्यांच्या हस्ते पहिले वृक्षारोपण

या मोहिमेतील पहिल्या झाडाचे रोपण 'माणुसकीची भिंत'चे अध्यक्ष गजानन दत्तात्रय जाधव यांच्या मातोश्री सौ. शांताबाई दत्तात्रय जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. प्रसिद्ध सप्तखंजिरी वादक,श्री पंकजपाल महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत 'कर्मयोगी संत गाडगे बाबा स्मृती स्थळ', जाधव बाग, पार्डी रोड, लिंबी येथे एक मोठे वडाचे झाड लावून या मोहिमेची अधिकृत सुरुवात झाली.

वृक्षप्रेमींची मोठी उपस्थिती.

या पर्यावरणपूरक कार्यक्रमाला पुसद परिसरातील विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये प्रामुख्याने शेती निष्ठ शेतकरी दत्तात्रय जाधव, माणुसकीच्या भिंतीचे अध्यक्ष गजानन जाधव, सचिव पंजाब ढेकळे, उपाध्यक्ष संतोष गावंडे, अनंता चतुर ,मधुकर चव्हाण, अरुण नागुलकर, गणेश सावंत, दिगंबर देशमुख, मंगेश भगत, प्रमोद ठाकूर, दादाराव पाईकराव, आदित्य जाधव,

मिशन ग्रीन बहुउद्देशीय संस्था अध्यक्ष रमेश डंबोळे, सचिव किरण किनाके, सदस्य निखिल गादेवार, अमित हटवार, विनोद शिंदे, नयन रामधनी.

 वसुंधरा बहुउद्देशीय संस्था: अध्यक्ष अमोल गंगात्रे, नितीन चव्हाण, राजेश माकोडे, अनिल कोटूरवार, मिलिंद बोबडे.

 इतर मान्यवर: प्रा. वसंत खाडे, प्रा. खाडे मॅडम, जयसिंग राठोड. रामचंद्र जाधव, सीता जाधव, मोनिका जाधव, ओम वाकोडे शीला वाकोडे अकोला प्रियंका देशमुख, बाबाराव अंभोरे, रेखा आगलावे शेख शकीला, देवा मस्के, सीमा मस्के,याप्रसंगी जाधव परिवाराचे सर्व नातेवाईक, 'माणुसकीची भिंत'चे सर्व शुभचिंतक सदस्य आणि लिंबी-पार्डी परिसरातील वृक्षप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावून या उपक्रमाचे कौतुक केले व वृक्ष संवर्धनाचा संकल्प केला.

No comments:

Powered by Blogger.