Header Ads

लग्नानंतरही विकृताचा पाठलाग! विवाहितेचे अश्लील फोटो-व्हिडिओ इन्स्टाग्रामवर व्हायरल; वैजापूर हादरले"

 "लग्नानंतरही विकृताचा पाठलाग! विवाहितेचे अश्लील फोटो-व्हिडिओ इन्स्टाग्रामवर व्हायरल; वैजापूर हादरले"बनावट इन्स्टाग्राम आयडी तयार करून बदनामी; मानसिक छळाला कंटाळून पीडितेची पोलिसांत धाव.

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

सांगली मिरज प्रतिनिधी राजु कदम.

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

वैजापूर (छत्रपती संभाजीनगर) : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यात एका २२ वर्षीय विवाहित महिलेचा अश्लील फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करून तिचा मानसिक छळ केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवरून वैजापूर पोलीस ठाण्यात एका तरुणाविरुद्ध विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.

माहितीनुसार, पीडित महिला आणि संशयित आरोपी यांची पूर्वी ओळख होती. या ओळखीचा गैरफायदा घेत आरोपीने महिलेचे काही आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ स्वतःकडे जतन करून ठेवले होते. दरम्यान, महिलेचा विवाह झाल्यानंतरही आरोपी तिच्याशी सतत संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होता. मात्र, वैवाहिक आयुष्य सुरळीत राहावे आणि बदनामी होऊ नये म्हणून महिलेने त्याच्याशी संपर्क ठेवण्यास स्पष्ट नकार दिला.

महिलेच्या नकारामुळे संतापलेल्या आरोपीने तिचे जुने आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. त्यानंतर त्याने इन्स्टाग्रामवर बनावट खाते तयार करून त्या खात्यावरून महिलेचे आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ प्रसारित केल्याचा आरोप आहे.

सततच्या धमक्या, बदनामी आणि मानसिक छळामुळे पीडित महिला प्रचंड तणावाखाली आली होती. अखेर हा त्रास असह्य झाल्याने तिने वैजापूर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.

महिलेच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी संबंधित आरोपीविरुद्ध विविध कायदेशीर कलमांनुसार गुन्हा नोंदविला असून, प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. सोशल मीडियाचा गैरवापर करून महिलांचा छळ करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिसांकडून देण्यात आला आहे.

No comments:

Powered by Blogger.