Header Ads

कोल्हापुरात जुन्या वादातून तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल.

 कोल्हापुरात जुन्या वादातून तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल.



कोल्हापूर | प्रतिनिधी

कोल्हापूर शहरातील नागाळा पार्क कमानीजवळ जुन्या भांडणाच्या रागातून एका तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला झाल्याची घटना घडली. या प्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना ५ जुलै २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ५ वाजता घडली. फिर्यादी निलेश किसन आकाडे (वय २४, रा. विचारे माळ, सिद्धार्थ हौसिंग सोसायटी, कोल्हापूर) हे त्यांचा मित्र रुपेश मिसाळ याच्यासह नागाळा पार्क कमानीजवळ डिजिटल बोर्ड लावण्याचे काम करत होते.

त्यावेळी जुन्या भांडणाचा राग मनात धरून ओम अजित लोखंडे, प्रेम लोखंडे आणि केदार लोखंडे यांनी फिर्यादीला शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर ओम लोखंडे याने फिर्यादीच्या डोक्यावर व हातावर कोयत्याने वार करून गंभीर जखमी केल्याची तक्रार फिर्यादीने दिली आहे.

या प्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम १०९, ११५(२), ३५२, ३(५) तसेच भारतीय हत्यार कायद्यातील कलम ५ व २७ अन्वये तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत वासुदेव करत आहेत.

No comments:

Powered by Blogger.