उमेद मायेच घर' येथे गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप ; समाजाकडून मदतीचा हात.
'उमेद मायेच घर' येथे गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप ; समाजाकडून मदतीचा हात.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~कुडित्रे (ता.करवीर ) येथील उमेद मायेच घर येथे अखिल भारतीय कलाकार एकता महासंघ,महाराष्ट्र राज्य कोल्हापूर. मैत्रांगण बहुउद्देशीय सेवा संस्था गडहिंग्लज,जनहित फौडेंशन इचलकरंजी आणि श्री समर्थ बहुउद्देशीय सामाजिक संस्था मरळी यांचे वतीने उमेद फौंडेशन (मायेच घर)गणेश नाळवा कोपार्डे ता करवीर येथील मुलांना शैक्षणिक साहित्य तसेच मुलांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी काही महिने पुरेल इतका पौष्टिक किराणा माल आणि इतर साहित्य सूपुर्त करणेत आले.या मदतीमुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.या कार्यक्रमाला कलाकार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष श्री जयवंत वायदंडे साहेब, अब्दुल गवंडी, मैत्रांगण बहुउदेशीय सेवा संस्था गडहिंग्लज, जनहित फौंडेशन इचलकरंजी, समर्थ संस्था मरळी या संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष सदस्य सचिव हजर होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना कलाकार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष जयवंत वायदंडे म्हणाले की,"अशा प्रकारच्या मदतीमुळे या मुलांना समाजात ताट मानेने जगण्याची आणि पुढे जाण्याची उमेद मिळते" या उद्देशाने या विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक उमेदचे अध्यक्ष प्रकाश गाताडे सर यानी केले. यावेळी प्रा पी जे पाटील सर,अब्दुल गवंडी,संभाजी दांगट यांनी आपले मनोगत व्यक्त केले.रुकसाना मुजावर, शप्पी मुजावर, मैत्रांगणच्या अध्यक्षा अनिता पाटील, जनहितच्या अरुणा जाधव या ही यावेळी उपस्थित होत्या . या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिव संभाजी दांगट यांनी तर आभार सुनिल डबीरे यानी मानले.

No comments: