उचगाव अत्याचारप्रकरणी संतापाची लाट; नराधमाला भर चौकात फाशीची शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)ची मागणी
उचगाव अत्याचारप्रकरणी संतापाची लाट; नराधमाला भर चौकात फाशीची शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)ची मागणी.
------------------------------------.उचगाव:- करवीर तालुक्यातील उचगाव येथे स्वतःच्या अल्पवयीन दोन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप असलेल्या पित्याविरोधात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणातील आरोपीवर फास्ट ट्रॅक न्यायालयात खटला चालवून त्याला कठोरात कठोर शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी करवीर तालुका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)च्या वतीने करण्यात आली.
करवीर तालुका प्रमुख राजू यादव यांनी या घटनेचा तीव्र निषेध करत, अशा विकृत प्रवृत्तीच्या आरोपीला कायद्यानुसार कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी केली. तसेच या प्रकरणाची जलदगतीने सुनावणी करून न्याय मिळावा, अशी भूमिका त्यांनी मांडली. यासंदर्भातील निवेदन गांधीनगर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अतुल कदम यांना देण्यात आले.
राजू यादव यांनी सांगितले की, या प्रकरणात आरोपीची बाजू घेण्यासाठी कोणत्याही वकिलाने वकीलपत्र स्वीकारू नये, अशी विनंती करण्यासाठी सोमवारी बार असोसिएशनशी संपर्क साधण्यात येणार आहे.
निवेदन देताना करवीर तालुका प्रमुख राजू यादव, फेरीवाला संघटनेचे उपतालुकाप्रमुख बाळासाहेब नलवडे, युवासेना तालुका प्रमुख योगेश लोहार, युवासेना चिटणीस सचिन नागटिळक, सुनील पारपाणी, शिवाजी लोहार, दीपक फ्रेमवाला, रामराव पाटील आदी उपस्थित होते.

No comments: