करवीर तालुका अध्यक्षपदी मन्सूर सय्यद यांची निवड; महाराष्ट्र राज्याच्या भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलनाची जबाबदारी सोपवली...
करवीर तालुका अध्यक्षपदी मन्सूर सय्यद यांची निवड; महाराष्ट्र राज्याच्या भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलनाची जबाबदारी सोपवली...
कोल्हापूर प्रतिनिधी:
भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन, महाराष्ट्र राज्य या राज्यव्यापी सामाजिक संघटनेने करवीर तालुका अध्यक्षपदी मन्सूर सय्यद यांची तीन वर्षांसाठी निवड केली आहे.संघटनेच्या नियुक्तीपत्रानुसार, प्रजासत्ताक देशाचे जबाबदार नागरिक म्हणून लोकशाहीचे संरक्षण, जनहितासाठी सत्यनिष्ठेने कार्य करणे, निस्वार्थ समाजसेवा करणे आणि भ्रष्टाचारविरोधी चळवळ तळागाळातील जनतेपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे. या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष उत्तम पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड झाली आहे.
या निवडीबद्दल विविध स्तरांतून मन्सूर सय्यद यांचे अभिनंदन होत असून, आगामी काळात करवीर तालुक्यात भ्रष्टाचारविरोधी जनजागृती आणि सामाजिक उपक्रम अधिक प्रभावीपणे राबवले जातील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

No comments: