डी सी नरके वरिष्ठ महाविद्यालयात उत्साहात वृक्षारोपण.
डी सी नरके वरिष्ठ महाविद्यालयात उत्साहात वृक्षारोपण.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~करंजफेण ता शाहूवाडी येथील डी सी नरके वरिष्ठ महाविद्यालयात वनमहोत्सवाच्या निमित्ताने वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. वाढते प्रदूषण आणि हवामान बदलावर मात करण्यासाठी 'एक विद्यार्थी एक झाड' हा संकल्प यावेळी सोडण्यात आला. कार्यक्रमाचे उद्घाटन कॉलेजचे सहाय्यक प्राध्यापक एस के वातकर सर यांचे हस्ते आंब्याचे रोप लावून झाले.
यावेळी बोलताना ते म्हणाले की, "केवळ झाडे लावणे महत्त्वाचे नसून ती जगवणे ही काळाची गरज आहे " या उपक्रमामुळे संपूर्ण महाविद्यालयाचा परिसर हिरवागार आणि प्रसन्न दिसू लागला आहे. या स्तूत्य उपक्रमा चे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. यावेळी प्रा. एस एस गवळी, प्रा डी एस बोळावे मॅडम, प्रा. जे एम कांबळे, प्रा आर टी राऊत, प्रा पी जे पाटील, प्रा एम आर मगदूम, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी-विद्यार्थींनी उपस्थित होते.

No comments: