Header Ads

सरनोबतवाडीत अवैध दारू अड्ड्यांवर कारवाईची मागणी; रिपब्लिकन सेनेचा प्रशासनाला ७ दिवसांचा अल्टिमेटम!

 सरनोबतवाडीत अवैध दारू अड्ड्यांवर कारवाईची मागणी; रिपब्लिकन सेनेचा प्रशासनाला ७ दिवसांचा अल्टिमेटम!

निवेदन देऊनही कारवाई नाही; दारू अड्डे बंद न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलनाचा इशारा.


~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

कोल्हापूर जिल्हा  प्रतिनिधी – शशिकांत  कुंभार.

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

करवीर तालुक्यातील सरनोबतवाडी येथील दत्त गल्लीमध्ये मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या कथित अवैध दारू विक्रीविरोधात रिपब्लिकन सेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. गावातील अवैध दारू अड्ड्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असून युवक व्यसनाधीन होत आहेत, घरगुती हिंसाचार आणि गुन्हेगारी वाढत असल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे.

रिपब्लिकन सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात तहसीलदार हनुमंत म्हेत्रे यांच्याकडे लेखी निवेदन सादर केले. यापूर्वीही जिल्हा पोलीस अधीक्षक, गांधीनगर पोलीस ठाणे, राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि ग्रामपंचायत सरनोबतवाडी यांच्याकडे तक्रार करूनही कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्याचा दावा करण्यात आला.

निवेदनात संबंधित अवैध दारू विक्रेत्यांवर तातडीने कठोर कारवाई करून गावातील दारू अड्डा कायमस्वरूपी बंद करण्याची मागणी करण्यात आली आहे. ७ दिवसांच्या आत कारवाई न झाल्यास रिपब्लिकन सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

निवेदन देताना उपस्थित पदाधिकारी

सागर कुरडे (जिल्हा महासचिव), अमोल कांबळे (जिल्हा युवा अध्यक्ष), भीमराव गोंधळी (करवीर तालुका अध्यक्ष), अर्जुन कांबळे (करवीर महासचिव), प्रवीण आजरेकर (कोल्हापूर शहर अध्यक्ष), अर्जुन गोंधळी, रसिका चौगुले (महिला आघाडी), साहिल कांबळे, सुशांत कांबळे, विनोद कांबळे आणि रवी कांबळे (युवा उपाध्यक्ष) उपस्थित होते.

No comments:

Powered by Blogger.