Header Ads

चांदूर बाजारात बबलूभाऊ देशमुख यांचा वाढदिवस उत्साहातसामाजिक उपक्रमांसह अभिष्टचिंतन; कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

 चांदूर बाजारात बबलूभाऊ देशमुख यांचा वाढदिवस उत्साहातसामाजिक उपक्रमांसह अभिष्टचिंतन; कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.


~~~~~~~~~~~~~~~~

प्रतिनिधी मयुर खापरे.

~~~~~~~~~~~~~~~

 

चांदूर बाजार दि. ३० :- कोणतीही सत्ता नसतानाही काँग्रेसचा कार्यकर्ता दगमगत नाही, तो आजही प्रामाणिकपणे माझ्यासोबत उभा आहे. मला सत्तेच्या अनेक ऑफर होत्या; मात्र विचारधारा बदलणे मला मान्य नव्हते. निवडणुकीतील पराभवाने मी खचलेलो नसून, देशातील परिस्थिती बदलत आहे. भाजपच्या भूलथापांना आता जनता बळी पडणार नाही, असा विश्वास अमरावती जिल्हा काँग्रेस कमिटी (ग्रामीण) चे अध्यक्ष तथा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अनिरुद्ध उर्फ बबलूभाऊ देशमुख यांनी व्यक्त केला.

बबलू देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवारी (२९ ऑगस्ट) चांदूर बाजार शहर व ग्रामीण काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित अभिष्टचिंतन व नागरी सत्कार सोहळ्यात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अमरावती लोकसभा मतदारसंघाचे खासदार बळवंत वानखडे होते.

वाढदिवसानिमित्त सकाळपासूनच विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. भव्य रक्तदान शिबिर, वृक्षारोपण, ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना फळे व बिस्कीटांचे वाटप, कोठारा लेप्रसी येथील कुष्ठरुग्णांसाठी प्रीतिभोजन तसेच विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेच्या पुस्तकांचे वाटप करण्यात आले. सामाजिक बांधिलकी जपत वाढदिवस साजरा करण्याच्या या उपक्रमाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.

यानंतर माधान रोडवरील रघुवंशी मंगल कार्यालयात बबलूभाऊ देशमुख यांच्या अभिष्टचिंतन व नागरी सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांनी उपस्थित राहून बबलूभाऊ देशमुख यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.


'माणसं घडविणारा नेता म्हणून बबलूभाऊ देशमुख यांची ओळख'

अध्यक्षीय भाषणात खासदार बळवंत वानखडे यांनी बबलूभाऊ देशमुख यांच्या नेतृत्वाचे कौतुक केले. कोणतेही पद किंवा सत्ता नसतानाही वाढदिवसानिमित्त एवढी मोठी गर्दी

होणे हे त्यांच्या कार्याचे फलित आहे. बबलूभाऊ देशमुख हे सातत्याने जनतेच्या सुख-दुखात सहभागी होतात आणि अहोरात्र जनतेसाठी काम करतात. त्यामुळेच कार्यकर्त्यांची त्यांच्यावरील निष्ठा आजही कायम असल्याचे दिसून येते, असे त्यांनी सांगितले.

स्वतःच्या खर्चाने कार्यक्रमाला उपस्थित राहणारी कार्यकर्त्यांची ही गर्दी त्यांच्या नेतृत्वावरील विश्वासाची खरी कमाई असल्याचेही वानखडे यांनी नमूद केले. देशातील सर्वाधिक काळ जिल्हाध्यक्ष पद भूषविणाऱ्यांमध्ये बबलूभाऊ देशमुख यांचे नाव अग्रस्थानी असून, वरिष्ठांनी त्यांच्या कार्याची दखल घेतलेली हीच खरी पावती असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी हरिभाऊ मोहोड, रामेश्वर अभ्यंकर, डॉ. रवींद्र वाघमारे, रावसाहेब लंगोटे पाटील, प्रमोद दाळू, प्रताप किटूकले, विलास बोरेकार, गणेशराव

बेलसरे अरविंद लंगोटे, रमेशराव घुलक्षे, महेरुला भाई, बाबूभाई इनामदार, प्रमोदराव घुलक्षे पाटील, योगेशराव पवार, येतेशाम नबील, किशोर देशमुख, हरिभाऊ मोहोड, रामेश्वर अभ्यंकर, डॉ. रवींद्र वाघमारे, रावसाहेब लंगोटे पाटील, प्रमोद दाळू, प्रताप किटूकले, विलास बोरेकार, गणेशराव बेलसरे अरविंद लंगोटे, रमेशराव घुलक्षे, महेरुला भाई, बाबूभाई इनामदार, प्रमोदराव घुलक्षे,सदाशिवराव खापरे,   राजेंद्र खापरे,          योगेशराव पवार, येतेशाम नबील, किशोर देशमुख, नामदेवराव तनपुरे, राहुल गवई नामदेवराव तनपुरे, राहुल गवई, उत्कर्ष देशमुख यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

अचलपूर व चांदूर बाजार तालुक्यातील पदाधिकारी काँग्रेसचे विविध सेल. पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले. कार्यक्रमानंतर उपस्थितांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते.

No comments:

Powered by Blogger.