पत्रकारानी निर्भीड, निपक्ष काम करावे- नगरसेवक प्रतापसिंह जाधव
पत्रकारानी निर्भीड, निपक्ष काम करावे- नगरसेवक प्रतापसिंह जाधव.
पन्हाळा - माधुरी मस्कर.
~~~~~~~~~±~~~~~~~~~~
पन्हाळा प्रेस क्लबच्या वतीने घेण्यात आलेला गौरव कर्तूत्वान व्यक्तींचा.. सोहळा आनंदाचा... हा सत्कार सोहळा विविध मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये नुकताच पार पडला अध्यक्षस्थानी कोल्हापूर महानगरपालिकेचे नगरसेवक प्रतापसिंह जाधव होते..
अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद महाराष्ट्र राज्य संलग्न व सेवा फाउंडेशन प्रायोजित पन्हाळा प्रेस क्लब यांच्या वतीने सन 2026 चा गौरव कर्तुत्ववान व्यक्तींचा... सोहळा आनंदाचा... हा पुरस्कार वितरण सोहळा विविध मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये नुकताच पार पडला.. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी कोल्हापूर महानगरपालिकेचे नगरसेवक प्रतापसिंह जाधव सरकार होते. या सोहळ्यामध्ये विविध क्षेत्रांमध्ये यशस्वी ठरलेल्या गुणवंत व्यक्तींचा गौरव करण्यात आला यामध्ये शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, व्यावसायिक व्यक्तींचा समावेश होता. या कार्यक्रमासाठी उद्योजक नामदेव पवार, महेश पोतदार, माजी पोलीस उप अधीक्षक राजेंद्र सुतार, माजी जिल्हा परिषदेचे सदस्य प्रकाश पाटील, पन्हाळा पंचायत समितीचे माजी सभापती पृथ्वीराज सरनोबत, बाजार समितीचे माजी सभापती परशुराम खुडे, बाजार समितीचे सदस्य शशिकांत आडनाइक, अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद महाराष्ट्र राज्य कोल्हापूर जिल्ह्याचे अध्यक्ष नारायण सुतार, कार्याध्यक्ष विनायक जितकर, पन्हाळा प्रेस क्लबचे अध्यक्ष किरण मस्कर, उपाध्यक्ष सुनील मोळे, सचिव दशरथ खुटाळे, सेवा फाउंडेशन चे अध्यक्ष डॉ. अरुण पाटील, दीपक साळुखे, रोहित पाटील, कृष्णा जमदाडे, तन्मय चोपडे, नेताजी देशमुख, यांच्यासह पत्रकार व पुरस्कार कर्ते उपस्थित होते...

No comments: