फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्रच्या कळे प्रतिनिधी साईश मोळे यांचा युवा उद्योजक पुरस्काराने सन्मान
फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्रच्या कळे प्रतिनिधी साईश मोळे यांचा युवा उद्योजक पुरस्काराने सन्मान.
फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र | काटेभोगाव प्रतिनिधी : प्रकाश चौगुले
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
कळे, ता. पन्हाळा : अल्पावधीत आपल्या व्यवसायाची वेगळी ओळख निर्माण करत ग्राहकांचा विश्वास संपादन करणारे कळे येथील युवा उद्योजक तसेच फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्रचे कळे प्रतिनिधी साईश मोळे यांना 'युवा उद्योजक पुरस्कार' प्रदान करून गौरविण्यात आले.
कळे येथे 'गगनगिरी स्पेशल गुळाचा चहा' या नावाने त्यांनी सुरू केलेल्या हॉटेल व्यवसायाने कमी कालावधीत लोकप्रियता मिळवली आहे. पारंपरिक चहाला गुळाची आरोग्यदायी चव, दर्जेदार गुणवत्ता, स्वच्छता आणि ग्राहकाभिमुख सेवा यामुळे कोल्हापूर–गगनबावडा मार्गावरील प्रवाशांची ही आवडती चहाची जागा बनली आहे.
पन्हाळा प्रेस क्लब आयोजित गौरव कर्तृत्ववान व्यक्ती पुरस्कार वितरण सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते साईश मोळे यांना हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा या सोहळ्यात सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमाला कोल्हापूर महानगरपालिकेचे नगरसेवक प्रतापसिंह जाधव, पन्हाळा प्रेस क्लबचे पदाधिकारी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
साईश मोळे यांना मिळालेल्या या सन्मानाबद्दल कळे, खेरीवडे, पन्हाळा आणि परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, युवा उद्योजकांसाठी त्यांचे कार्य प्रेरणादायी असल्याच्या भावना व्यक्त होत आहेत.

No comments: