सह्याद्रीचा आकांत आणि भीमाशंकरची हाक: सायडोंगरमधील बेसुमार वृक्षतोड तातडीने थांबलीच पाहिजे! आ.डॉ. विश्वजीत (बाळासाहेब) पतंगराव कदमसाहेब
सह्याद्रीचा आकांत आणि भीमाशंकरची हाक: सायडोंगरमधील बेसुमार वृक्षतोड तातडीने थांबलीच पाहिजे!
आ.डॉ. विश्वजीत (बाळासाहेब) पतंगराव कदमसाहेब
महाराष्ट्राचे वैभव असलेल्या भीमाशंकर-सह्याद्रीच्या संवेदनशील पट्ट्यालगत, कर्जत तालुक्यातील (जि. रायगड) सायडोंगर वनक्षेत्रात टोरेंट पॉवर कंपनीच्या प्रस्तावित मेगावॅट जलविद्युत प्रकल्पासाठी सुरू असलेली अधिक झाडांची कत्तल तातडीने थांबवणे हे पुढच्या पिढीच्या अस्तित्वासाठी आवश्यक आहे.
वनजमीन या प्रकल्पासाठी वळवली जात असून, हा परिसर महाराष्ट्राचा राज्यप्राणी 'शेकरू', बिबट्या, भेकर आणि दुर्मिळ पक्षी-वनस्पतींचे हक्काचे निवासस्थान आहे. निसर्गाचा समतोल बिघडवणे हे भविष्यात भूस्खलन आणि पाणीटंचाईला आमंत्रण ठरेल.
निसर्गाची वेदना आणि हाक श्वास आणि आसरा दोन्ही धोक्यात!
भीमाशंकरची वृक्षतोड मानवी आरोग्यासाठी आणि वन्यजीवांसाठी विनाशकारी"
भीमाशंकर आणि सह्याद्रीच्या जंगलांची बेसुमार कत्तल केवळ झाडांचा नाश नसून, मानवी अस्तित्व आणि मुक्या प्राण्यांच्या जीवनावर झालेला थेट आघात असून संपूर्ण जंगल महाराष्ट्राला शुद्ध ऑक्सिजन पुरवणारे निसर्गाचे 'फुफ्फुस' आहे. येथील हजारो जुनी झाडे नष्ट झाल्यामुळे हवेची गुणवत्ता कमालीची खालावेल, ज्यामुळे मानवाला श्वास घेण्याचे गंभीर आजार, दमा आणि फुफ्फुसांचे विकार जडण्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे.
हजारो पक्ष्यांचे हक्काचे घर (आसरा) आणि अन्नाचे स्त्रोत कायमचे हिरावून घेत आहे. झाडे तोडल्यामुळे बेघर झालेले हे वन्यप्राणी अन्नाच्या शोधात मानवी वस्त्यांकडे धाव घेतील, ज्यामुळे 'मानव-वन्यजीव संघर्ष' भयानक रूप धारण करेल. निसर्गाचे हे हानीकारक चक्र थांबवून आपला श्वास आणि वन्यजीवांचा आसरा वाचवण्यासाठी ही वृक्षतोड तातडीने थांबलीच पाहिजे.
विकासाला आमचा विरोध नाही, पण विकासाच्या नावाखाली समृद्ध जंगलांवर कुऱ्हाड चालवणे अयोग्य आहे.
स्थानिक आदिवासी, शेतकरी आणि पर्यावरणप्रेमींच्या भावनांचा आदर करून ही वृक्षतोड थांबवावी आणि हा प्रकल्प निसर्गाची हानी न करणाऱ्या पर्यायी जागी हलवावा, हीच आमची मागणी आहे.
सह्याद्रीचे रक्षण की निसर्गाचा विनाश? प्रकल्पासाठी होणारी बेसुमार वृक्षतोड तातडीने थांबलीच पाहिजे!"

No comments: