Header Ads

बुद्ध विहार संभाजीनगर येथे वर्षावास समारोप व पौर्णिमा खीरदान कार्यक्रम उत्साहात संपन्न

 बुद्ध विहार संभाजीनगर येथे वर्षावास समारोप व पौर्णिमा खीरदान कार्यक्रम उत्साहात संपन्न..

सिद्धार्थ कदम पुसद तालुका प्रतिनिधी

पुसद : येथील संभाजीनगरमधील बुद्ध विहार (डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन) येथे मागील तीन महिन्यांपासून सुरू असलेल्या वर्षावास कालावधीचा समारोप व पौर्णिमेनिमित्त खीरदान कार्यक्रम उत्साहात पार पडला. या वर्षावास काळात ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ या पवित्र ग्रंथाचे वाचन करण्यात आले.


बौद्ध परंपरेमध्ये वर्षावास हा अत्यंत महत्त्वपूर्ण काळ मानला जातो. या कालावधीत भगवान गौतम बुद्धांच्या विचारांचे चिंतन, धम्माचे अध्ययन आणि सामाजिक प्रबोधनाला विशेष महत्त्व दिले जाते. याच उद्देशाने बुद्ध विहारात तीन महिन्यांपासून ग्रंथवाचनाचा उपक्रम राबविण्यात आला.


या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून ज्येष्ठ शिक्षक तथा धम्मभूषण मा. विठ्ठलराव खडसे सर (शिक्षण सभापती, नगर परिषद पुसद) यांची उपस्थिती लाभली. यावेळी त्यांनी उपस्थितांना धम्मविचार व सामाजिक प्रबोधनाच्या अनुषंगाने मार्गदर्शन केले. कार्यक्रमात विविध मान्यवरांचीही उपस्थिती होती.


कार्यक्रमाचे आयोजन जागो भीमसैनिक मित्र मंडळ तथा महिला मंडळ यांच्या वतीने करण्यात आले होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते रंगनाथ धिरे आणि गजानन धाबे यांनी विशेष परिश्रम घेतले.


वर्षावास समारोपाच्या निमित्ताने आयोजित या कार्यक्रमातून भगवान गौतम बुद्धांचे विचार, धम्माचे महत्त्व आणि सामाजिक एकतेचा संदेश देण्यात आला. पौर्णिमेनिमित्त खीरदान करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

No comments:

Powered by Blogger.