Header Ads

महाराष्ट्राच्या 'शिवकाशी'त आतषबाजीचा थरार ! कवठेएकंदमध्ये ३५० वर्षांची परंपरा; सिद्धराज महाराजांच्या पालखी सोहळ्यासाठी भाविकांची मांदियाळी !

 महाराष्ट्राच्या 'शिवकाशी'त आतषबाजीचा थरार ! कवठेएकंदमध्ये ३५० वर्षांची परंपरा; सिद्धराज महाराजांच्या पालखी सोहळ्यासाठी भाविकांची मांदियाळी !




कुपवाड मिरज -प्रतिनिधी राजु कदम


आपल्या अद्वितीय आणि थरारक शोभेच्या दारूकामासाठी जगभरात नावलौकिक मिळवलेल्या कवठेएकंद (ता. तासगाव) येथे आज, २० ऑक्टोबर रोजी ग्रामदैवत श्री सिद्धराज महाराजांच्या (बिर्‍हाडसिद्ध) दसरा महोत्सवानिमित्त भव्य आतिषबाजीचा सोहळा रंगत आहे. ३५० वर्षांपेक्षा जास्त काळ अविरत सुरू असलेला हा दैदीप्यमान सोहळा डोळ्यांत साठवण्यासाठी महाराष्ट्र आणि शेजारच्या कर्नाटकातून लाखो शौकिनांचा महापूर कवठेएकंदमध्ये दाखल झाला आहे.

रात्रभर अविरत चालणार सोहळा

आज रात्री ८ च्या सुमारास पालखी सोहळ्याला सुरुवात झाली असून, उद्या (२१ ऑक्टोबर) सकाळी सूर्योदयापर्यंत सलग १२ तास संपूर्ण गाव विविध प्रकारच्या रंगीबेरंगी प्रकाशाने न्हाऊन निघणार आहे. पालखी मार्गावरील विविध मंडळांनी देवाच्या स्वागतासाठी डोळ्यांचे पारणे फेडणारी जय्यत तयारी केली आहे.

हातनिर्मित कलेचा अनोखा चमत्कार

बाजारातील रेडीमेड फटाके न वापरता गावातील स्थानिक तज्ज्ञ कारागीर म्हणजेच 'गोलंदाज' स्वतः तयार केलेले दारूकाम वापरतात, हे या उत्सवाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य. चिंचेच्या लाकडात रासायनिक मिश्रणे ठासून बनवलेली पारंपरिक 'शिंगटी' (जी पेटवल्यावर आकाशात २०० फूट उंच झेप घेते) आणि प्रचंड आवाजाचे 'औट' यंदाही आकाशात रंगांची उधळण करणार आहेत. गर्दीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस प्रशासनाने परिसरात चोख सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे.

No comments:

Powered by Blogger.