उमेद मायेचं घर मधील दिव्यांग सूरज गुरवची राज्यस्तरीय पॅरा स्विमिंग स्पर्धेत विजयी झेप.
उमेद मायेचं घर मधील दिव्यांग सूरज गुरवची राज्यस्तरीय पॅरा स्विमिंग स्पर्धेत विजयी झेप.
कळे प्रतिनिधी
साईश मोळे
९५९५३१६२६६
कळे:- उमेद फौंडेशन संचालित उमेद मायेचं घर सामाजिक प्रकल्पातील दिव्यांग विद्यार्थी सूरज गुरव याने मुंबई येथे पार पडलेल्या 18 व्या राज्यस्तरीय पॅरा स्विमिंग चॅम्पियनशिप 2026 स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
एकल पालकत्व असलेला आणि दिव्यांग असूनही जिद्दी व मेहनती असलेल्या सूरजने या स्पर्धेत तिन्ही प्रकारात पदक मिळवले आहे.
१) बॅकस्ट्रोक - द्वितीय क्रमांक (रौप्य पदक)
२) फ्रीस्टाईल 100 मीटर - तृतीय क्रमांक (कांस्य पदक)
३) फ्रीस्टाईल 50 मीटर - तृतीय क्रमांक (कांस्य पदक)
कोल्हापूर-गगनबावडा रोडवरील सांगरूळ फाटा, गणेश नाळवा, कोपार्डे (ता. करवीर) येथील उमेद मायेचं घर या प्रकल्पात सूरज राहतो. संस्थेच्या आधारातून त्याने पोहण्याचे प्रशिक्षण घेतले आणि आपल्या कष्टाने हे यश मिळवले.
या यशाबद्दल उमेद फौंडेशन सेवा परिवारातर्फे सूरजचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले असून त्याला पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. उमेद फौंडेशन हे शिक्षण, संस्कार व स्वावलंबन या त्रिसूत्रीवर काम करणारी संस्था आहे.

No comments: