जत तालुक्यात खंडणीसाठी हवेत गोळीबार; निलेश गडदे व दोन साथीदारांचा जामीन फेटाळला!
जत तालुक्यात खंडणीसाठी हवेत गोळीबार; निलेश गडदे व दोन साथीदारांचा जामीन फेटाळला!
सांगली कुपवाड प्रतिनिधी राजू कदम.जत | दि. १४ ऑक्टोबर २०२६
जत तालुक्यातील बाज गावात खंडणी मागून हवेत गोळीबार करत दहशत निर्माण केल्याप्रकरणी निलेश गडदे, सॅन्डी ऊर्फ संदेश घागरे आणि किरण लोखंडे या तिघांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे.
या प्रकरणी जत पोलीस ठाण्यात ११ जून २०२६ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. निलेश गडदे व त्याच्या नऊ साथीदारांविरुद्ध गुन्हा नोंद असून, तिघांनी जामिनासाठी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, जत न्यायालयात अर्ज दाखल केला होता. मात्र, न्यायालयाने हा अर्ज फेटाळल्याने तिघांना जामीन मिळू शकलेला नाही.
खंडणी आणि गोळीबाराच्या या प्रकरणात न्यायालयाच्या निर्णयाकडे लक्ष वेधले गेले आहे.

No comments: