दसरा-दिवाळीपूर्वी बंद रेशन सुरू करा! करवीर शिवसेनेचा इशारा,अन्यथा गावोगावी रास्ता रोको.
दसरा-दिवाळीपूर्वी बंद रेशन सुरू करा! करवीर शिवसेनेचा इशारा; अन्यथा गावोगावी रास्ता रोको.
कोल्हापूर | फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र
करवीर तालुक्यात सुमारे ४,५०० लाभार्थ्यांचे रेशन बंद करण्यात आल्याच्या निषेधार्थ शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने बंद केलेले रेशन तात्काळ सुरू करण्याची मागणी करण्यात आली. यासंदर्भातील निवेदन जिल्हा पुरवठा अधिकारी शक्ती कदम यांना देण्यात आले.
आयकर विवरणपत्र भरणे, कंपनीच्या संचालकपदासह विविध निकषांमुळे गोरगरीब लाभार्थ्यांचे रेशन बंद करण्यात आल्याचा आरोप शिवसेनेने केला. लाभार्थ्यांचे म्हणणे ऐकून न घेता धान्यपुरवठा बंद करणे अन्यायकारक असल्याचे सांगत, दसरा-दिवाळीच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही जाचक अटींशिवाय रेशन पूर्ववत सुरू करण्याची मागणी करण्यात आली.
“बंद रेशन तात्काळ सुरू करा, अन्यथा रस्त्यावर उतरू!” असा इशारा करवीर तालुकाप्रमुख राजू यादव यांनी दिला. मागणी मान्य न झाल्यास रेशनपासून वंचित लाभार्थ्यांना सोबत घेऊन गावोगावी रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशाराही शिवसेनेने दिला.
हे आंदोलन जिल्हाप्रमुख विराज पाटील व तालुकाप्रमुख राजू यादव यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते

No comments: