Header Ads

कळे पोलीस ठाण्यात 'नशामुक्त महाराष्ट्र' शॉर्ट फिल्मचा शुभारंभ.

 कळे पोलीस ठाण्यात 'नशामुक्त महाराष्ट्र' शॉर्ट फिल्मचा शुभारंभ.

माधुरी मस्कर-पन्हाळा 

महाराष्ट्र शासन व पोलीस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्र यांच्या माध्यमातून आयोजित प्रबोधनात्मक उपक्रमांतर्गत बनाई फिल्म प्रोडक्शन, नांदारी निर्मित 'नशामुक्त महाराष्ट्र' या शॉर्ट फिल्मचा शुभारंभ नुकताच कळे पोलीस ठाणे येथे करण्यात आला.

यावेळी कळे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक कदम यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी फिल्ममधील सर्व कलाकारांचे स्वागत व सत्कार करण्यात आला.

व्यसनाधीन तरुण कसा भरकटत जातो आणि भरकटत गेलेल्या तरुणाला पोलीस व्यसनापासून कसे दूर करतात, यावर ही फिल्म आधारित असणार आहे. आजची पिढी नशेमध्ये धुंद होऊन रस्त्याने फिरताना दिसत आहे. अशा तरुणांवर वेळीच उपचार करून त्यांच्यामध्ये बदल घडवण्याचे काम पोलीस सुद्धा करू शकतात, हे या फिल्ममधून दाखवण्याचा मानस दिग्दर्शकांचा असल्याची माहिती बनाई प्रोडक्शनचे दिग्दर्शक अनिल कांबळे यांनी दिली.

या फिल्मसाठी मार्गदर्शक म्हणून कोल्हापूर जिल्हा पोलीस प्रमुख निल्तोपल लाभले आहेत, अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक कदम यांनी यावेळी दिली.

व्यसनमुक्तीसाठी जनजागृती व्हावी, तरुण पिढी व्यसनापासून दूर राहावी, हा या फिल्ममागील मुख्य उद्देश आहे. लवकरच या फिल्मचे चित्रीकरण पूर्ण होऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

No comments:

Powered by Blogger.