अखिल भारतीय ब्राम्हण महासंघ कोल्हापूर शाखेचे वतीने ज्येष्ठ नागरिकांचे सत्कार संपन्न.
अखिल भारतीय ब्राम्हण महासंघ कोल्हापूर शाखेचे वतीने ज्येष्ठ नागरिकांचे सत्कार संपन्न.
अखिल भारतीय ब्राह्मण महा संघाच्या जेष्ठ नागरिक आघाडीचे वतीने नोव्हेंबर महिन्याची मासिक सभा उत्साही वातावरणात दि.२५नोव्हेबर रोजी पार पडली.या सभेसाठी उपस्थीत सर्व जैष्ठांचे स्वागत जेष्ठ नागरिक आघाडीचे अध्यक्ष चिंतामणी जोशी यांनी केले.विनायक कुलकर्णी यांनी प्रास्ताविक करून उपस्थितांना संघटनेचे उद्दिष्ट समजावून सांगितले.महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष शाम जोशी यांनी समाजाने एकत्रीत असण्याचे फायदे विषद करुन त्यासाठी प्रयत्न- शीलअसू या व आपल्या हिताचे निरनिराळे उपक्रम राबवून त्यातून एकत्रीत येवून विचारांचे आदानप्रदान करू या,असे सांगून जेष्ठांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. यावेळी राष्ट्रीय उपाध्यक्ष शाम जोशी यांचा सत्कार अध्यक्ष चिंतामणी जोशी यांनी बूके देवून केला.तसेच दत्तात्रय मुंगळे,अनिता मुंगळे, उदय वाठारकर, विवेक जोशी,नानासो कुलकर्णी, रघुनाथ कुलकर्णी,राजेंद्र पित्रे, श्रीनिवास वाठारकर असे९जणांचे नँपकीन बुके देवून सत्कार करण्यात आले. यानंतर व्याख्याते श्रीयुत आचार्यसर यांचे "जीवनातील ज्येष्ठ नागरिकांचे विविध उपक्रम तसेच साठ वर्षानंतर ज्येष्ठ नागरिकांनी काय काळजी घेतली पाहिजे?जेष्ठांचा आचारविचार कसा असला पाहिजे? आणि या काळातील प्रत्येक अवस्थेतून जाताना जेष्ठांनी कोणती काळजी घेतली पाहिजे" हे उदाहरणासह आपल्या व्याख्याना- तून उत्कृष्ट मार्गदर्शन केले. तसेच त्यांनी आचार्य विनोबा भावे यांच्या आयुष्यातील काही प्रसंग व ज्येष्ठ नागरिकांच्या साठी काही सूचना व्याख्याना मधून देत मोलाचा सल्लादेखील दिला.शेवटी यशवंत मसकर यांनी उपस्थित सभासदांचे आभार मानले व चहापान झाल्यावर हा ज्येष्ठ नागरिकांचा आनंदी उपक्रम खेळीमेळीच्या वातावरणात पार पडला.यावेळी बाबा वाघापूरकर,प्राजक्ता जोशी,सुधीर कुलकर्णी आदी सभासद उपस्थीत होते.
---------------------------

No comments: